नागपूर : विदर्भातील काही भागात पूर आल्यामुळे आजपासून सुरु होणारी JEE आणि नीटची परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे (JEE and NEET Exam). पूरग्रस्त भागातील विद्यार्थी परीक्षेला मुकण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा येथे पुरामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेला जाण्यास अडचण निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली आहे (JEE and NEET Exam).
नागपूर खंडपीठात आज (1 सप्टेंबर) 8.30 वाजता विद्यार्थ्यांच्या मागणीवर सुनावणी होणार आहे. परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पुरामुळे गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना परीक्षेला येण्यास अडचण निर्माण झाली आहे. JEE आणि ‘नीट’ परिक्षेसाठी विद्यार्थ्यांना नागपूर शहरात सेंटर मिळाले आहे.
पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षेला पोहोचण्यास अनेक अडचणी येत आहेत. युथ काँग्रेसच्या शिवानी वडेट्टीवार यांनीही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, JEE आणि नीट परीक्षेला मोठा विरोध विद्यार्थी आणि काही राजकीय पक्षांकडून करण्यात आला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आजपासून ही परीक्षा सुरु होत आहे. JEE 1 सप्टेंबर ते 6 सप्टेंबर आणि नीट परीक्षा 13 सप्टेंबरला आहे. नुकतेच सुप्रीम कोर्टाने कोरोना काळात या परीक्षांना अनुमती दिली होती.
संबंधित बातम्या :
NEET-JEE ऐवजी खेळण्यांवर चर्चा, मोदींच्या ‘मन की बात’वर राहुल गांधींची टीका
मोदी सरकारने विद्यार्थ्यांची ‘मन की बात’ ऐकावी, JEE-NEET परीक्षांवरुन राहुल गांधींचा सरकारवर निशाणा