कबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, नगरपालिकेकडून सरकारला प्रस्ताव

| Updated on: Jul 18, 2019 | 9:15 AM

पाकिस्तानमधील लाहोर नगरपालिकेने पंजाब प्रांतातील सरकारला मृतदेह दफन करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या कबरींसाठी एक हजार ते पंधराशे रुपये आकारण्याची शिफारस केली आहे.

कबरींवर 1000 ते 1500 रुपयांचा कर लावा, नगरपालिकेकडून सरकारला प्रस्ताव
Follow us on

लाहोर: पाकिस्तानमधील लाहोर नगरपालिकेने पंजाब प्रांतातील सरकारला मृतदेह दफन करण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या कबरींसाठी एक हजार ते पंधराशे रुपये आकारण्याची शिफारस केली आहे. पाकिस्तानमधील ‘जंग’ या दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार लाहोर नगरपालिकाने आपल्या कार्यक्षेत्रातील नव्या कबरींवर कर लावण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी सरकारकडे पाठवला आहे.

कबरींवरील करातून त्याच कबरींची देखभाल केली जाईल, असाही युक्तीवाद करण्यात आला आहे. आधीच मृतदेहांना दफन करण्यासाठी जवळपास 10 हजार रुपये खर्च येतो. जर हा कर देखील लावण्यात आला तर नागरिकांवर त्याचा मोठा भार पडेल, असेही सांगण्यात येत आहे.

वाढती लोकसंख्या आणि जागेची कमतरता यामुळेही कबरींची व्यवस्था करणे दिवसेंदिवसे कठीण होत आहे. अनेकदा मृतदेह दफन केल्यानंतर सुरुवातीच्या काळात त्याकडे लक्ष दिले जाते आणि नंतर मात्र, दुर्लक्ष होते. त्या कबरींची देखभालही होत नाही आणि त्यातून परिस्थिती अधिक विदारक होण्याचे प्रमाणही अधिक आहे. त्यामुळे लाहोर नगरपालिकेने घेतलेल्या करांचा निर्णय कितपत यशस्वी ठरतो हे लवकरच ठरेल.