विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले
देवेंद्र फडणवीस सध्या अतिवृष्टीमुळे झालेल्या भागाची पाहणी करत असून त्यांनी परळीतील गोपीनाथगडाला भेट दिली.
गोपीनाथगडावर जाऊन देवेंद्र फडणवीसांनी गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केल्यानंतर उपस्थितांशी चर्चा केली.
उस्मानाबाद मधील नुकासानाची पाहणी फडणवीस यांनी केली.
लातूर जिल्ह्यातील आशिव येथेही फडणवीसांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देणार असल्याचे शेतकऱ्यांना सांगितले..