मुंबई : “कोरोना चाचण्या सातत्याने कमी करण्यामुळे आपण काय कमावले आणि काय गमावले?” असा सवाल करत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आकडेमोड मांडली आहे. अधिकाधिक चाचण्या हा कोरोना मृत्यू रोखण्याचा एकमात्र उपाय असल्याचे सांगत फडणवीस यांनी ट्वीटद्वारे काही प्रश्न उपस्थित केले आहेत. (Devendra Fadnavis asks what we lost and gained by very less COVID19 testing)
“महाराष्ट्रातील कोरोना संसर्गाचा दर सुरुवातीला 6 ते 7 टक्के होता, तो 8 जूनपर्यंत 17 ते 18 टक्क्यांवर आला आणि आता 23 ते 24 टक्के. म्हणजे 100 चाचण्यांमागे 24 जणांना कोरोनाची लागण” असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या ट्वीटमध्ये फडणवीसांनी महाराष्ट्रातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण, पॉझिटिव्ह रुग्ण, रुग्णांची टक्केवारी आणि कोरोनाबळींची आकडेवारी जोडली आहे.
“मुंबईतील कोरोना संसर्गाचा दर 21 ते 27 टक्क्यांवर स्थिरावलेला आहे. चाचण्यांची संख्या अद्यापही अतिशय कमी आहे. 1 ते 19 जुलैच्या दरम्यानची सरासरी काढली तरी दररोज केवळ 5500 चाचण्या. महाराष्ट्र आणि मुंबईतील चाचण्यांची संख्या दररोज सरासरी तेवढीच” असे फडणवीस यांनी पुढे म्हटले आहे.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी नवी दिल्लीत वेळेत हस्तक्षेप केल्यानंतर आणि चाचण्यांची संख्या वाढवल्यानंतर काय घडले ते पहा. चाचण्यांची संख्या वेगाने वाढवल्याने संसर्गाचा दर 30 ते 35 टक्क्यांवरुन आता 6 टक्क्यांवर आला आणि कोरोना बळींच्या संख्येतही घसरण. तरीही चाचण्यांची संख्या दररोज कायम ठेवली आहे” असे फडणवीस यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.
हेही वाचा : “ही राजकीय भेट नाही, सरकार पाडण्यात रस नाही” फडणवीसांची अमित शाहांशी दीड तास चर्चा
“आता तरी जागे व्हा. मी सातत्याने मुंबईत कोव्हिड टेस्टिंग वाढवण्याची विनंती करतोय. कोरोनाला हरवून बळी रोखण्याचा एकच मार्ग आहे. चाचण्या, शोध आणि उपचार (टेस्ट, ट्रेस, ट्रीट)” असा दावा फडणवीसांनी केला आहे.
What have we lost and what we gained due to very less #COVID19 testing❓
Infection rate in Maharashtra was around 6-7% in the beginning, then at 17-18% on 8th June and now at 23-24% .
This means 24 positives in every 100 tests❗️ pic.twitter.com/mgbd9BgZZ9— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 21, 2020
(Devendra Fadnavis asks what we lost and gained by very less COVID19 testing)