नवी दिल्ली : देशात कोरोना विषाणूच्या संसर्गाची संख्या वाढत आहे. दुसरीकडे कोरोनावरील लशीच्या वैद्यकीय चाचणीलाही वेग आला आहे. कोरोना लशीच्या चाचणीचा पहिला टप्पा अत्यंत वेगाने पूर्ण झाल्यानंतर आता पुढील टप्प्यातील चाचणीसाठी तयारी होत आहे (DGCI approve testing of Corona vaccine). नुकतीच डीजीसीआयने या वैद्यकीय चाचणीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी दिली आहे (DGCI approve testing of Corona vaccine).
जगभरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संसर्गासोबतच कोरोना लसीचेही युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. याचाच भाग म्हणून भारतात ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (DCGI) सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला कोरोना लस वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी दिली आहे. सिरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाला ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीची कोरोना लस Astra Zeneca च्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय चाचणीसाठी परवानगी मिळाली.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
मागील महिन्यातच ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या कोविड-19 लशीचा पहिला आणि दुसरा टप्पा यशस्वी राहिला आहे. यातील चाचण्यांचा निकाल अनुकुल आला आहे. ब्राझिलमध्ये केल्या गेल्लाय मानवी चाचणीचे परिणाम सर्वाधिक चांगले आले आहेत. एप्रिलमध्ये याआधी पहिल्या टप्प्यातील मानवी चाचण्यांना सुरुवात झाली होती. या काळात जवळपास 1112 रुग्णांवर याचं परिक्षण करण्यात आलं. तिसऱ्या टप्प्यातील चाचणी साऊथ आफ्रिका आणि ब्राझिलमध्ये होणार आहेत. आता भारतात देखील तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरु होणार आहेत.
मागील काही दिवसांपासून देशभरात दिवसाला जवळपास 50 हजार लोकांना कोरोना संसर्ग होत असल्याचं समोर आलं आहे. देशात मागील 24 तासात 52,972 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 771 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात एकूण कोरोना पीडितांची संख्या 18 लाख 03 हजार 696 इतकी झाली आहे. आतापर्यंत एकूण 38,135 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 79 हजार 357 सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. तसेच 11 लाख 86 हजार 203 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.
हेही वाचा :
रशियातील कोरोना लसीच्या चाचणीचे तिन्ही टप्पे पूर्ण, जगात कुठे काय घडतयं?
Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी
DGCI approve testing of Corona vaccine