धनंजय मुंडेंकडून ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर! स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा

| Updated on: Apr 17, 2020 | 6:04 PM

ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय (Dhananjay Munde on Migrant Workers) राज्य सरकारने घेतला आहे.

धनंजय मुंडेंकडून ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर! स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा
Follow us on

कोल्हापूर : ऊसतोड मजूर आणि त्यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा देणारा निर्णय (Dhananjay Munde on Migrant Workers) राज्य सरकारने घेतला आहे. ऊस हंगाम संपला असला तरी लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. मात्र आता पावसामुळे हाल होतं असल्यान आम्हाला घरी न्या अशी मागणी या कामगारांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. यानंतर धनंजय मुंडे यांनी ऊसतोड मजुरांना आवश्यक तपासण्या करुन त्यांच्या स्वगृही परतण्याचा मार्ग मोकळा केला आहे. नुकतंच याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

“माझ्या ऊसतोड बांधवांसाठी खुशखबर!

तुमचा स्वगृही परतण्याचा मार्ग आता खुला झाला आहे. शासनाने यासंबंधी (Dhananjay Munde on Migrant Workers) आदेश निर्गमित केला आहे. शासनाने घालून दिलेल्या नियमाच्या अधीन राहून घरी परता. स्वतःच्या आरोग्याची त्याचबरोबर आपल्या गावाचीही काळजी घ्‍या. स्वगृही परतल्यावर कुटुंबासह घरातच रहा,” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

“कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील दत्त साखर कारखाना परिसरात झालेल्या वादळाने कारखाना परिसरात वास्तव्यास असलेल्या ऊसतोड मजुरांच्या पालांचे नुकसान झाले. माझ्या सूचनेवरून प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्यासह कारखान्याचे एमडी पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली, मजुरांची योग्य व्यवस्था केली,” अशीही माहिती धनंजय मुंडेंनी दिली.

“अधिक नुकसान झालेल्या ऊसतोड मजुरांना त्वरित शिरोळ येथील पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये स्थलांतरित केले आहे. त्यांना जीवनावश्यक वस्तू, किराणा इत्यादी वस्तू पुरवण्यात आले. ऊसतोड मजुरांची गैरसोय होऊ नये यासाठी कोल्हापूर शुगर कमिशनर, जिल्हाधिकारी, प्रांत तहसीलदार यांच्याशी मी सतत संपर्कात आहे,” असेही त्यांनी ट्विट करत सांगितले.

“राज्यात विखुरलेल्या ऊसतोड मजुरांना टप्प्याटप्प्याने स्वगृही आणण्यासाठी राज्यशासन कटिबद्ध आहे. मजुरांची संख्या, त्यांची आरोग्य तपासणी, गावकऱ्यांची सुरक्षा याचा विचार करून येत्या काही दिवसांत निर्णय घेतला जाईल. राजकारण करून लोकांच्या भावनांशी खेळून त्यांच्या जीवाचा खेळ मांडू नका,” असा सल्लाही धनंजय मुंडे यांनी दिला आहे.

कोल्हापुरातील ऊसतोड मजुरांची मागणी

कोल्हापूरातील शिरोळमध्ये झालेल्या वादळी पावसाने दत्त सहकारी साखर कारखाना परिसरात राहणाऱ्या मजुरांच्या 500 हून अधिक झोपड्या जमीनदोस्त झाल्या. उरलं-सुरलं धान्य भिजले तसेच अन्नात पाणी साचले. अंथरुण पांघरुन भिजले.

पालाची काठी डोक्यात पडल्यानं एक महिला ही किरकोळ जखमी झाली. पाऊस गेल्यानंतर काही क्षणात हजारो ऊसतोड मजुरांनी एकत्र येत गोंधळ सुरू केला. ऊस हंगाम संपला असला मात्र लॉकडाऊनमुळे या कामगारांना घरी जाता आलं नाही. त्यातचं आता पावसामुळं हाल होतं असल्यानं आम्हाला घरी न्या, अशी मागणी या कामगारांनी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली होती. त्यांची ही मागणी धनंजय मुंडे यांनी मान्य केली आहे. त्यांना स्वगृही जाण्याचा मार्ग मोकळा करुन दिला आहे.

पंकजा मुंडेंचं आवाहन 

दरम्यान याप्रकरणी ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे आक्रमक पावित्रा घेतला होता. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं (Dhananjay Munde on Migrant Workers) होतं.