Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत ‘धारावी पॅटर्न’ लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा

| Updated on: Jul 27, 2020 | 12:46 AM

वाढत्या संसर्गामुळे शहरात आज 388 नवे रुग्ण वाढले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या 13,618 झाली आहे

Navi Mumbai Corona | कोरोनावर मात करण्यासाठी नवी मुंबईत धारावी पॅटर्न लागू, आयुक्तांकडून प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा
Follow us on

नवी मुंबई : नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत (Dharavi Pattern Applied In Navi Mumbai) असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज 388 नवे रुग्ण वाढले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13,618 झाली आहे (Dharavi Pattern Applied In Navi Mumbai).

महापालिका आयुक्त अभिजित बांगर (IAS Abhijit Bangar) यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी स्वतः विभाग कार्यालयात जाऊन प्रत्यक्ष कामकाजाचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अभिजित बांगर यांनी कोरोनावर आळा घालण्यासाठी नवी मुंबईत धारावी पॅटर्न राबवण्यात सुरुवात केली आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

आठ विभागाचे सह आयुक्त विभाग अधिकारी, विभाग कार्यक्षेत्रातील जुहूगाव आणि वाशीगाव या दोन्ही केंद्राचे आरोग्य अधिकारी तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना अधिक रितीने उपाययोजना राबवण्याचे निर्देशित केले. या ठिकाणी वाशी विभागाचे अतिरिक्त आयुक्त, उपआयुक्त उपस्थित होते.

कोव्हिड-19 ला उपाययोजना करुन कमी करायचेच आहे. पण त्यादृष्टीने बाकी आजारांच्या रुग्णांवर दुर्लक्ष करुन चालणार नाही. त्याच्याकडे देखील लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्या विभाग क्षेत्रात किती कोरोना पॉझिटिव्ह आहेत, किती जणांचा मृत्यू झाले, याकडे बारकाईने लक्ष ठेवून शोध आणि तपासणी वाढविण्याची भर देण्याचे आयुक्तांनी ठरवले आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना दिवसातून किमान 2 वेळा दूरध्वनीवरुन त्यांची प्रकृती जाणून घ्यावी, असे निर्देश आयुक्तांनी केले आहेत (Dharavi Pattern Applied In Navi Mumbai).

ज्या भागात 5 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, तिथे साधारण 100 मीटरचे क्षेत्र तिसऱ्या प्रकारचे कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येते. त्या परिसराची रितसर तपासणी करुन आत-बाहेर पडण्याच्या सीमा उंच बॅरिकेटिंग लावून बंद कराव्यात, अशा ठिकाणी पोलिसांची मोठी भूमिका राहील आणि नागरिकांना वस्तू कसे उपलब्ध करुन देता येतील यांचे नियोजन करावे. लॉकडाऊनचे नियम काटेकोरपणे पाळले जातील याकडे दक्षता घ्यावी, असे अभिजीत बांगर यांनी सांगितले.

कोरोनाचा वाढता प्रभाव खंडित करण्यासाठी याकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. तरच आपण कोरोनावर मात करु शकतो, असे अभिजीत बांगर यांनी सांगितलं.

नवी मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज 388 नवे रुग्ण वाढले असून 10 जणांचा मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या 13,618 वर

शहरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13,618 झाली आहे. तर आज 10 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 388 झाली आहे. शहरात आतापर्यंत तब्बल 8,830 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरुवात केली आहे. बांगर यांच्यासमोर शहरातील कोरोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

नवी मुंबईत कुठे किती रुग्ण?

बेलापूर – 49
नेरुळ – 59
वाशी – 47
तुर्भे – 25
कोपरखैरणे – 79
घणसोली – 54
ऐरोली – 64
दिघा – 11

Dharavi Pattern Applied In Navi Mumbai

संबंधित बातम्या :

नवी मुंबईत अनलॉकनंतर 146 पोलिसांना कोरोनाची लागण