Kshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक

| Updated on: Sep 26, 2020 | 3:26 PM

अखेर २७ तासांच्या चौकशीनंतर क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. (Dharma Productions executive producer Kshitij Prasad Arrested By NCB)

Kshitij Prasad Arrest | ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे निर्माता क्षितीज प्रसादची 27 तास चौकशी, समाधानकारक उत्तर न दिल्याने अटक
Follow us on

मुंबई : सुशांत सिंह प्रकरणाच्या तपासातून ड्रग्ज अँगलसमोर आला. हे ड्रग्ज कनेक्शन प्रकरण बॉलिवूडपर्यंत पोहोचलं आहे. चौकशी दरम्यान धर्मा प्रोडक्शन्सचे संचालक निर्माता क्षितीज प्रसाद याला आधी ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतरही झालेल्या चौकशीत त्याने समाधानकारक माहिती न दिल्याने अखेर २७ तासांच्या चौकशीनंतर क्षितीजला एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे. (Dharma Productions executive producer Kshitij Prasad Arrested By NCB)

एनसीबीच्या टीमने शुक्रवारी क्षितीजला चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यानंतर रात्री त्यांना ताब्यात घेतलं गेलं. जवळपास 27 तास त्याची कसून चौकशी केली गेली. त्यानंतर क्षितीजला अटक करण्यात आली आहे. क्षितीजने दिलेल्या माहितीच्या आधारावर मुंबईत चार ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्याशिवाय क्षितीजच्या चौकशीदरम्यान त्याने अनेक मोठ्या नावांचाही खुलासा केल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पाहा फोटो :  दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर NCB कार्यालयात, प्रश्नांची सरबत्ती

तर दुसरीकडे दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून कसून चौकशी सुरु आहे. दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर या तिघींची आज (शनिवार 26 सप्टेंबर) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून चौकशी होत आहे. एनसीबीने दीपिकाला दिलेल्या चौकशीच्या वेळेआधीच 15 मिनिटं दीपिका एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली. त्याशिवाय दीपिकाची मॅनेजर करिश्मा प्रकाशही एनसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी दाखल झाली आहे.

तर एनसीबीकडून सारा अली खान आणि श्रद्धा कपूरला 10.30 वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र त्या दोघींनीही एनसीबीकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यानंतर जवळपास 11.48 सुमारास श्रद्धा कपूर एनसीबीच्या कार्यालयात दाखल झाली.

तसेच सारा अली खान हिने चर्चेला येण्यापूर्वी तिचे वडील अभिनेता सैफ अली खान यांच्याशी चर्चा केली. यावेळी कायदेशीर बाबींवर सल्ला ही घेण्यात आला. या चर्चेनंतर ती एनसीबी कार्यालयाकडे रवाना झाली. ती जवळपास दुपारी 1 वाजता एनसीबी कार्यालयात दाखल झाली. सध्या दीपिका, सारा आणि श्रद्धा या तिघींची चौकशी सुरु आहे.

शुक्रवारी (25 सप्टेंबर) अभिनेत्री रकुल प्रीत सिंहसह दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश या दोघींची एनसीबीने चौकशी केली. या चौकशी दरम्यान दोघींकडूनही अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे. ड्रग्ज देवाण-घेवाणीसाठी बनवलेल्या व्हाट्सअॅप ग्रुपची (drug group) ‘अॅडमिन’ दीपिका स्वतः असल्याचे, करिश्माने एनसीबीला सांगितले.

क्षितीज प्रसादकडून मोठ्या नावांचा खुलासा

तर निर्माता क्षितीज प्रसाद यांनी चौकशीत अनेक मोठ्या नावांचा खुलासा केला आहे. यात अनेक बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे. रकुल प्रीत सिंहने चौकशीदरम्यान क्षितीज प्रसादचे नाव घेतले होते. क्षितीज अनेकांना ड्रग्ज उपलब्ध करुन देण्याचे काम करायचा, असे रकुल प्रीतने सांगितले होते.  (Dharma Productions executive producer Kshitij Prasad Arrested By NCB)

करण जोहरकडून खुलासा 

या सर्व प्रकरणानंतर चित्रपट दिग्दर्शक करण जोहर याने एक पत्रक जारी केलं आहे. ‘माझ्या घरात ड्रग्स पार्टी झाली नाही. माझ्यावर होत असलेले आरोप खोटे आहेत. क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांचा धर्मा प्रॉडक्शनशी काहीही संबंध नाही’, असं करण जोहर स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या : 

Deepika Padukone | दीपिका आणि साराचा ड्रग्ज सेवन केल्याचा इन्कार; चौकशी सुरूच

ड्रग्ज प्रकरणात ‘धर्मा प्रोडक्‍शन’चे नाव, निर्माता क्षितीज प्रसादला एनसीबीचा समन्स