धुळे : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहे. तसेच बरं होऊन घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत असल्याने काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. कोरोनाने सुरुवातीला मुंबई आणि पुणे या ठिकाणी विळखा घातला. त्यानंतर मुंबई आणि पुण्याहून अनेक लोक गावाकडे येण्यास निघाले. लॉकडाऊन असतानाही अनेकांनी चालत गाव गाठलं. यात शहरातून आलेल्या काहींना कोरोनाची लागण झाली. मात्र मुंबईतून धुळ्यात परतलेल्या एका तरुणाच्या दक्षतेमुळे संपूर्ण गावाला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला नाही.
धुळ्यातील शिंदखेडा तालुक्यात डांगुर्णे गावातील एक तरुण मुंबईतून आला (Dhule Corona Patient Chain Breaker) होता. मात्र या तरुणाने घरी न जाता आपल्या शेतात राहण्याचा निर्णय घेतला. हा तरुण उच्चशिक्षित असून तो एका कंपनीत कामाला आहे. त्यामुळे त्याला संसर्गाचा परिणाम माहिती होता. त्यानुसार त्याने कुटुंबाला न भेटता शेतातच वास्तव्य केलं.
तो तरुण शेतात राहत असताना तीन दिवसांनी त्याला त्रास होऊ लागला. त्यानंतर त्याने स्वत: हून दवाखाना गाठला. श्री भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज या ठिकाण गेल्यानंतर त्याची स्वॅब टेस्ट घेण्यात आली. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र मुंबईतून आल्यानंतर या तरुणाने शेतात वास्तव्य केल्याने गावात इतर कोणालाही कोरोनाचा संसर्ग झाला नाही.
या तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यानंतर दहा दिवसांनी या तरुणाने कोरोनावर मात केली आहे. तो पूर्णपणे ठणठणीत बरा झाला.
दरम्यान या तरुणाच्या दक्षतापूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे त्याच्यासह संपूर्ण कुटुंबाचं कौतुक केलं जात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी अक्षय तृतीया सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पण अक्षय तृतीयाच्या दिवशीही हा मुलगा शेतातच होता. या दिवशी कोणीही त्या भेटण्यासाठी गेले नव्हते.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे अनेकजण गावी जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे.
धुळे जिल्ह्यात आतापर्यंत साखरी, शिंदखेडा, शिरपूर आणि धुळे तालुक्यातील शिरपूर तालुका कोरोना मुक्त झाला आहे. तर शिंदखेडा तालुक्यातील तीन पैकी दोन रुग्ण ठणठणीत बरे होऊन आपल्या गावी परतले आहेत. त्याशिवाय चिमठाणे गावातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने सध्या ते उपचार घेत (Dhule Corona Patient Chain Breaker) आहेत.
संबंधित बातम्या :
सोलापुरात 16 पोलिसांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील आकडा 250 वर