धुळ्यात कपड्याच्या दुकानात पोलिसांची छापेमारी, तस्करी होणाऱ्या 25 तलवारी जप्त

| Updated on: Dec 07, 2020 | 4:09 PM

कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात तलवारांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. (Dhule 25 Sword Seized by Police)

धुळ्यात कपड्याच्या दुकानात पोलिसांची छापेमारी, तस्करी होणाऱ्या 25 तलवारी जप्त
Follow us on

धुळे : धुळे शहरातील सार्वजनिक रुग्णालयाजवळ असलेल्या एका कपड्याच्या दुकानात पोलिसांनी छापा टाकला आहे. या छापेमारीत गुन्ह्याच्या उद्देशाने तस्करी होणाऱ्या एकूण 25 तलावरी जप्त केल्या आहेत. या धडक कारवाईत एकाला बेड्या ठोकून धुळे पोलिसांनी अटक केली आहे. (Dhule 25 Sword Seized In Cloths store by Police)

धुळ्यातील सार्वजनिक रुग्णालयामागे असलेल्या कपड्याच्या दुकानात मोठ्या प्रमाणात तलवारांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुप्त माहितीच्या आधारे धुळे पोलिसांनी संध्याकाळच्या सुमारास अचानक छापा टाकला. यावेळी तपासणी केली असता, कपड्याच्या पिशवीमध्ये 19 तलवारी आढळून आल्या. रविवारी संध्याकाळी ही कारवाई करण्यात आली.

याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्यांनी या तलवारींची कुठे विक्री केली, त्या तलवारी कोण घेणार होते? अशी सर्व चौकशी केली आहे. या चौकशीतंर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. यावेळी आरोपींकडून 6 तलवारींची विक्री केल्याचे उघड झाले आहे.

यावेळी धुळे पोलिसांनी 23 मोठ्या तलवारी, 2 लहान तलवारी, चाकू, चॉपर असा एकूण 38 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच आरोपींनी या तलवारी मालेगाव येथून आणल्याची माहिती मिळत आहे. (Dhule 25 Sword Seized In Cloths store by Police)

संबंधित बातम्या : 

इचलकरंजीत एका रात्रीत पाच दुकानांवर डल्ला, पैसे, दागिन्यांसह गुटखाही लंपास

बाप नव्हे सैतान! गुप्तांगावर मेणाचे चटके, अमानुष मारहाण, सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र बापाला अटक