अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वारंवार पर्यटकांना वाघोबाचे दर्शन होते. आता पुन्हा एकदा मेळघाटमधील रस्त्याने आपल्या वाहनातून कर्तव्यावर जाणाऱ्या शिक्षकाला चार छाव्यांसह वाघिणीने दर्शन दिले.
मेळघाटमध्ये वाघांची संख्या वाढत असल्याने वन्यजीव अभ्यासकांसह स्थानिकांमध्ये आणि पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या छाव्यांना रस्त्यावर पाहून शिक्षकाने व्हिडीओच काढला.
भरदिवसा रस्त्यावर चार छावे दिसल्यामुळं या भागात पर्यटकांची संख्या वाढणार आहे. स्थानिक रहिवशांसाठी ही आनंददायी बाब आहे.
दरीतून रस्ता काढल्यानंतर या छाव्यांनी उंच सुरक्षित ठिकाणी धूम ठोकली. तोपर्यंत काही दिसलेच नाहीत.
आधी वाघाची डरकाळी ऐकायला येत नव्हती. आता थेट रस्त्यावरून छावे दर्शन देत असल्यानं पर्यटक सुखावतात. गाडी आल्याचे पाहून छावे रस्त्यावरून धूम ठोकून पळाले नि घनदाट जंगलात शिरले.