पंकजांसमोर खासदार दिलीप गांधींना मुंडे समर्थकांचे खडेबोल

| Updated on: Jul 05, 2019 | 4:55 PM

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगरमध्ये एकमेकांची उणीदुणी निघत आहेत. असाच प्रकार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बाबतीत झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आज अहमदनगरमध्ये सभा आणि रॅली आहे. एका सभेत दिलीप गांधींना मुंडे समर्थकांनी पंकजांसमोर खडेबोल सुनावले. मुंडे साहेबांचं नाव घेऊ नका, तुम्ही फक्त आश्वासन देता, गेली दहा वर्षे तुम्ही फिरकले नाही, […]

पंकजांसमोर खासदार दिलीप गांधींना मुंडे समर्थकांचे खडेबोल
Follow us on

अहमदनगर : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत अहमदनगरमध्ये एकमेकांची उणीदुणी निघत आहेत. असाच प्रकार अहमदनगरचे भाजप खासदार दिलीप गांधी यांच्या बाबतीत झाला. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांची आज अहमदनगरमध्ये सभा आणि रॅली आहे. एका सभेत दिलीप गांधींना मुंडे समर्थकांनी पंकजांसमोर खडेबोल सुनावले. मुंडे साहेबांचं नाव घेऊ नका, तुम्ही फक्त आश्वासन देता, गेली दहा वर्षे तुम्ही फिरकले नाही, असा सवाल मुंडे समर्थकांनी केला.

यानंतर खासदार गांधीही चांगलेच भडकले. आम्हाला माहित आहे तुम्हाला काय लागतंय. कोणाच्या पोटात काय दुखतंय हे आम्हाला माहिती आहे. खासदारांनी गटारीचं काम करायचं का? असा सवाल गांधींनी उपस्थित केला. गांधी सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात, यावेळी भरसभेत हा प्रकार घडल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या.

सध्या अहमदनगर महापालिकेचा प्रचार शिगेला पोहचलाय. यासाठी भाजपाकडून स्टार प्रचारकाची फौज उभी करण्यात आली आहे. या प्रचारासाठी पंकजा मुंडे आल्या असता एका कॉर्नर सभेत हा प्रकार घडला.

अहमदनगर महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आजपर्यंत सत्ता भोगली आहे. तर पालिकेची स्थापना झाल्यापासून भाजपला कधीच सत्ता मिळवता आली नाही. मात्र देशात आणि राज्यात सध्या भाजपची सत्ता असल्याने नगरच्या भाजपामध्येही आपलीच सत्ता येणार असा आत्मविश्वास निर्माण झालाय. महापालिका निवडणुकीसाठी भाजपच्या मुलाखतींना इच्छुकांचा प्रचंड प्रतिसाद पहिला मिळाला. ढोलताशांच्या गजरात इच्छुक उमेदवारांनी मुलाखतींना हजेरी लावली. नगरच्या महापालिका निवडणुकीत इतर पक्ष उमेदवारांसाठी चाचपडत असताना भाजपकडून मात्र उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली होती.

अहमदनगर महापालिकेच्या 17 प्रभागातील 68 जागांसाठी 9 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 10 डिसेंबरला मतमोजणी होईल. शहराची एकूण लोकसंख्या 3 लाख 46 हजार 755 तर एकूण मतदारांची संख्या 2 लाख 56 हजार 719 इतकी आहे. नगर पालिकेत 17 प्रभागात 68 वार्ड आहेत.

महापालिकेतील सध्याचं पक्षीय बलाबल

राष्ट्रवादी :-18

शिवसेना :-18

काँग्रेस :-11

भाजप :-9

मनसे :-4

अपक्ष:-9

एकूण :-68

संबंधित बातम्या :

अहमदनगर : तीन मुली तीन पक्षात, म्हणूनच कर्डिले किंगमेकर!