Diwali 2020 | मधुमेहाचे रुग्णदेखील खाऊ शकतील ‘हे’ घरगुती गोड पदार्थ!

| Updated on: Dec 07, 2020 | 12:29 PM

आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वजन वाढणे, मधुमेह आणि कॅलरी वाढीच्या भीतीमुळे बरेच लोक मिठाई खाणे टाळतात.

Diwali 2020 | मधुमेहाचे रुग्णदेखील खाऊ शकतील ‘हे’ घरगुती गोड पदार्थ!
Follow us on

मुंबई : दिवाळीची चाहूल लागताच प्रत्येकाच्या घरात मिठाई आणि फराळाची लगबग सुरू होते. पूर्वी एक काळ असा होता की, लोक सणाच्या निमित्ताने भरपूर मिठाई खात असत. परंतु, आजच्या व्यस्त जीवनशैलीमुळे वजन वाढणे, मधुमेह आणि कॅलरी वाढीच्या भीतीमुळे बरेच लोक मिठाई खाणे टाळतात. विशेषत: मधुमेहाच्या रुग्णांना इच्छा असूनही मिठाई शक्य होत नाही. मात्र, दिवाळीचा (Diwali 2020) सण मिठाईशिवाय अपूर्ण आहे. दिवाळीच्या निमित्ताने आपण काही गोड पदार्थ घराच्या घरी बनवू शकतो (Home Made Sweets). हे गोड पदार्थ अगदी मधुमेहाचे रुग्णदेखील चाखू शकतील (Diwali 2020 diabetes people also eat these home made sweets).

मधुमेह रूग्ण बाहेरच्याऐवजी घरी बनवलेल्या मिठाई खाऊ शकतात. घरगुती मिठाईत ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते, ज्यामुळे आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण नियंत्रित होते. घरगुती मिठाईत वापरलेले तूप, नारळ, डाळी आणि शेंगदाणे ग्लाइसेमिक इंडेक्स कमी करतात. आपल्यापैकी बर्‍याचजणांना याची माहिती नसते. या सर्व गोष्टी मिठाईची चवही वाढवतात आणि साखरही नियंत्रणात ठेवतात.

फिनी

फिनी एक राजस्थानी मिठाई आहे. पीठ, साखर आणि शुद्ध तूप वापरून ही मिठाई बनवता येते. आपण यात साखरेऐवजी मध वापरू शकतो. मध मधुमेह रूग्णांसाठी फायदेशीर आहे. मध खाल्ल्याने त्यांना गोड पदार्थ खाण्याचा आनंद घेता येतो आणि साखर वाढत नाही (Diwali 2020 diabetes people also eat these home made sweets).

दुधीचा हलवा

गोड पदार्थांमध्ये दुधीचा हलवा देखील एक चांगला पर्याय आहे. यासाठी तूप, दुधी, थोडे दूध, वेलची पूड या साहित्याची आवश्यकता असते. मधुमेह असलेल्या लोकांसाठी दुधी खाणे खूप फायदेशीर आहे.

खजूर रोल

खजूर मधुमेहाच्या रुग्णांसाठी अतिशय लाभदायक आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्ती बदामांनी सजवलेले खजूर रोल अगदी कुठलीही चिंता न करता खाऊ शकतात. खजूर रोल खाल्ल्याने शरीरातील साखरेची पातळी वाढणार नाही.

अंजीर बर्फी

अंजीर आपल्या पचनसाठी खूप फायदेशीर आहे. अंजीर बर्फीमध्ये अतिरिक्त साखर वापरण्याची गरज भासत नाही. पचनाबरोबरच अंजीर बर्फी आपल्या मधुमेहावर देखील नियंत्रण ठेवते. अंजीर बर्फी काजू, बदाम, पिस्ता, अंजीर, तूप आणि मध एकत्र करून बनवली जाते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच अंजीर बर्फी नक्की आवडेल.

(Diwali 2020 diabetes people also eat these home made sweets)