पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता, नागरिकांना जवानांच्या नावे दिवा लावण्याचे आवाहन

| Updated on: Nov 13, 2020 | 8:41 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता, नागरिकांना जवानांच्या नावे दिवा लावण्याचे आवाहन
Follow us on

नवी दिल्ली : देशात गुरुवारपासून दिवाळीच्या शुभपर्वाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोना रोगाच्या प्रादूर्भावामुळे सर्वत्र साधेपणाने दिवाळी साजरी केली जात आहे. अशावेळी सीमेवर राहून देशाची सेवा करणाऱ्या जवानांसोबत दिवाळी (Diwali 2020) साजरी करण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ठरवलं आहे. दरम्यान पंतप्रधानांनी ट्विट करुन देशातील नागरिकांना दिवाळीनिमित्त सीमेवरील जवानांच्या नावाने एक दिवा लावण्याचे आवाहन केले आहे. (Diwali 2020 : PM Modi likely to celebrate Diwali with Indian Army Jawans)

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट केलं आहे की, “या दिवाळीत आपण सीमेवरील जवानांना सलामी देण्यासाठी एक दिवा लावायला हवा. आपल्या सैनिकांच्या महान पराक्रमासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करायला हवी. आम्ही सीमेवरील सैनिकांच्या कुटुंबियांचे खूप आभारी आहोत”.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी दरवर्षी सीमेवरील जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. गेल्या वर्षी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील एलओसीजवळच्या राजौरी जिल्ह्यात जवानांसोबत दिवाळी साजरी केली होती. त्याअगोदर त्यांनी उत्तराखंड आणि इतर ठिकाणी जाऊन दिवाळी साजरी केली होती. यंदा मोदी जैसलमेरमध्ये जाऊन ते दिवाळी साजरी करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांची लेह भेट

काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेहला भेट दिली होती. भारत-चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर त्यांची लेह भेट विशेष महत्त्वाची मानली गेली. लेह दौऱ्यावेळी पंतप्रधान मोदींनी जवानांसोबत संवाद साधला होता, तसेच त्यांचा आत्मविश्वास बुलंद केला होता. दरम्यान, कोरोनाचं संकट भारतातून गेलेलं नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी साजरी करताना कोरोनाचे नियम पाळा, असं आवाहन मोदी यांनी केलं आहे.

पाकिस्तानचे 10-12 जवान टिपले, भारतीय जवानांची धडाकेबाज कारवाई

दरम्यान, आज (13 नोव्हेंबर) दुपारी एक वाजेच्या सुमारास पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन केलं आहे. पाकिस्तानी सैन्याने सीमारेषेवर बारामुल्ला, गुरेज, उरी, कुपवाडा या चार भागात बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात भारताचे तीन जवान शहीद झाले आहेत, तसेच काही सर्वसामान्य नागरिकांचादेखील मृत्यू झाला आहे

पाकिस्तानाकडून करण्यात आलेल्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलं. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 10 ते 12 सैनिकांचा खात्मा केला. पण या चकमकीत भारताचेदेखील तीन जवान शहीद झाले आहेत. याशिवाय एक भारतीय जवान गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. या जवानाचं नाव वासू राजा असं आहे. या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत

संबंधित बातम्या

मोठी बातमी: पँगाँग सरोवराच्या परिसरातून सैन्य मागे घेण्याची चीनची तयारी, भारताला दिला ‘हा’ प्रस्ताव

पंतप्रधान मोदी जैसलमेरमध्ये जवानांसोबत दिवाळी साजरी करण्याची शक्यता

(Diwali 2020 : PM Modi likely to celebrate Diwali with Indian Army Jawans)