इगतपुरी (नाशिक) : सौंदर्यनगरी म्हणून ओळख असलेले शहर म्हणजे इगतपुरी. मात्र गेल्या काही दिवसांपासून इगतपुरी शहरात भटक्या कुत्र्यांनी (Dog Bitten people in Igatpuri) धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन महिन्यात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 107 नागरिकांना चावा (Dog attack) घेतला आहे. असे असतानाही प्रशासनही कोणतीही अंमलबजावणी (Dog Bitten people in Igatpuri) करताना दिसत नाही.
इगतपुरी शहर हे नाशिक मुंबई महामार्गच्या लगत आहे. तसेच या शहराच्या जवळच कसारा घाट आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहनांची रेलचेल असते. यातील काही वाहनांमधून ही भटकी कुत्री (Dog Bitten people in Igatpuri) या ठिकाणी सोडली जातात. त्यानंतर ही कुत्री जवळच्या वस्त्यांकडे जातात. गेल्या दोन महिन्यात तब्बल 107 नागरिकांना या कुत्र्यांनी चावा घेतल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. त्यामुळे शहरातील नागरिकही धास्तावले आहे.
त्यामुळे इगतपुरी रस्त्याच्या कडेला भटकी कुत्री अगदी बिनधास्तपणे तळ ठोकून बसतात. जर कोणीही या कुत्र्यांना हकलण्याचा प्रयत्न केला, तर हे कुत्रे थेट अंगावर धावून येतात आणि लचके तोडतात. त्यामुळे शहरातील सर्व नागरिक कुत्र्यांच्या दहशतीखाली वावरत आहेत.
अशाप्रकारे भटक्या कुत्र्यांचा वावर संपूर्ण शहरात वाढला आहे. इगतपूरी शहरात भटकी कुत्री गल्लोगल्ली बघायला मिळतात. नागरिकांनी फेकलेल्या अन्नपदार्थांवर आपली भूक भागवून ही कुत्री इकडे तिकडे फिरत असतात. मात्र या भटक्या कुत्र्यांवर प्रशासन कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही. ही कुत्री विशेषत: लहान मुलांना लक्ष्य करतात आणि चावा घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासही भिती वाटत आहे.
दरम्यान प्रशासनाने ही कुत्र्यांची वाढती संख्या लक्षात घेता, लवकरात लवकर खबरदारीचे पाऊल उचलावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत. तसेच जे कोणी बाहेरून आणून कुत्रे सोडत असतील, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी अशीही मागणी यानिमित्ताने करण्यात आली आहे.