पुणे : बिबट्या कुत्र्यांच्या शिकारीत तरबेज असताना खेड तालुक्यात मात्र उलट (Dogs hunting leopard pune) घडलं आहे. खेड तालुक्यातील कोयाळी येथे भटक्या कुत्र्यांच्या टोळक्यांनी बिबट्यावर हल्ला करत त्याला ठार केले आहे. या घटनेमुळे सर्व गावकऱ्यांकडून कुत्र्यांचे कौतुक केले (Dogs hunting leopard pune) जात आहे.
मृत बिबट्याचा पंचनामा वनविभागाने केला असून बिबट्याला माणिकडोह बिबट्या निवारा केंद्रात नेण्यात आले आहे. बिबटा दिवसभर ऊस शेतीत वास्तव्य करुन रात्रीच्या सुमारास शिकारीच्या शोधात बाहेर पडत होता. अशातच भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने शिकारी बिबट्याचीच शिकार केल्याची घटना घडली.
गेल्या काही दिवसांपासून खेड तालुक्यात बिबट्याची दहशत पसरली होती. बिबट्याने आतापर्यंत येथील अनेक भटके कुत्रे आणि माणसांवर हल्ला केला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी गावकऱ्यांकडून केली जात होती.
दरम्यान, खेडमधील कोयाळी खेडे गावात मोठ्या प्रमाणात भटके कुत्रे आहेत. यापूर्वीही बिबट्याने येथील अनेक कुत्र्यांवर हल्ला केलेला आहे. तसेच इतर पाळीव प्राण्यांवरही हल्ला केला आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत संपूर्ण गावात पसली होती. पण कुत्र्यांनी बिबट्याला ठार केल्याने बिबट्याची दहशत संपलेली आहे.