Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन

| Updated on: Oct 02, 2020 | 1:30 PM

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांची कोव्हिड-19 चाचणी करण्यात आली. यामध्ये दोघेही पॉझिटिव्ह आढळले आहेत.

Donald Trump | अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना, फर्स्ट लेडीसह क्वारंटाईन
Follow us on

वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प या दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष ट्रम्प आणि फर्स्ड लेडी हे दोघेही आता क्वारंटाईन झाले आहेत. याबाबतची माहिती ट्रम्प यांनी स्वतः ट्विटरद्वारे दिली आहे. (Donald Trump and Melania Trump tested positive for COVID-19)

होप हिक्स (Hope Hicks) या काही काळ खासगी क्षेत्रात काम करुन नुकत्याच व्हाईट हाऊसमध्ये परतल्या होत्या. राष्ट्राध्यक्षांच्या खासगी सल्लागार म्हणून त्या काम पाहात आहेत. 2016 च्या निवडणुकीदरम्यान हिक्स यांनी ट्रम्प यांच्या कॅम्पेनचे प्रवक्तेपद सांभाळले होते.

ट्रम्प यांची भारतावर टीका

दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच भारतातील कोव्हिड-19 च्या परिस्थितीबद्दल भाष्य केले होते. ट्रम्प म्हणाले होते की, भारताने देशात कोरोनामुळे झालेल्या मृतांची खरी आकडेवारी जगासमोर मांडलेली नाही. तसेच भारत पर्यावरणाचे मोठे प्रदूषण करत आहे. ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बायडन (Joe Biden) या दोघांमद्ये मंगळवारी कोरोनाच्या परिस्थितीवरुन वादविवाद झाले. त्यावेळी या दोघांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबद्दल माहिती आणि स्वतःची मतं मांडली. हे करत असताना दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप-प्रत्यारोपही केले.

अमेरिकेत कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक मृत्यू

बायडन म्हणाले की, अमेरिकेत कोरोनामुळे आतापर्यंत 2 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर जगभरात 10 लाखांहून अधिक मृत्यू झाले आहेत. जगभरातल्या मृत्यूंपैकी 20 टक्के मृत्यू एकट्या अमेरिकेत झाले आहेत. परंतु जगाच्या लोकसंख्येच्या तुलने अमेरिकेची लोकसंख्या केवळ 4 टक्के आहे. यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, तुम्ही संख्येबद्दल बोलत आहात. परंतु चीनमध्ये किती मृत्यू झालेत हे तुम्हाला माहीत आहे का? रशियामध्ये किती लोकांचा मृत्यू झाला आहे? तसेच तुम्हाला हेदेखील माहीत नाही की, भारतात किती मृत्यू झाले आहेत. कारण ते लोक तुम्हाला खरी आकडेवारी देत नाहीत.

संबंधित बातम्या

अमेरिकेच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मोदींच्या मैत्रीचा फायदा होणार?

Corona Vaccine | जॉन्सन ॲण्ड जॉन्सनची लस 3 आठवड्यात बाजारात – डोनाल्ड ट्रम्प

(Donald Trump and Melania Trump tested positive for COVID-19)