वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील पराभवानंतर सद्याचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आणखी एक फटका बसला आहे. सोशल मीडियावर सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची लोकप्रियता सातत्याने कमी होत आहे. दुसरीकडे, अध्यक्षपदाची निवडणूक जिंकणारे जो बायडन यांची लोकप्रियता वेगानं वाढत आहे. सोशल नेटवर्किंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर डोनाल्ड ट्रम्प यांचे फॉलोअर्स सातत्याने कमी होत आहेत. जा बायडन यांच्या फॉलोअर्सची संख्या वेगात वाढत आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरुन निवडणुकीच्या घोटाळ्याची ट्विट केल्यामुळे त्यांचे फॉलोअर्स कमी होत असल्याचं मानलं जात आहे. (Donald Trump lost his two lakh followers on social media)
फोर्ब्सच्या अहवालानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटरवरील 2 लाख 20 फॉलोअर्स मागील दोन आठवड्यांमध्ये कमी झाले आहेत. त्यांचे फॉलोअर्स वाढण्याऐवजी सातत्यानं कमी होत आहेत. एका अहवालानुसार 17 नोव्हेंबरला ट्रम्प यांचे 88 कोटी 96 लाख 4 हजार 791 फॉलोअर्स होते. तर 5 डिसेंबर रोजी 88 कोटी 74 लाख4 हजार 369 फॉलोअर्स होते.
जो बायडन यांच्या फॉलोअर्समध्ये 40 टक्के वाढ झाली आहे. बायडन यांच्या फॉलोअर्सची संख्या 11 कोटी 1 लाख 80 हजार वरुन 20 कोटी 65 लाख 3 हजार 432झाली आहे. गेल्या 18 दिवसांत बायडन यांच्या फॉलोअर्सची संख्या 15 लाखांनी वाढली आहे. (Donald Trump lost his two lakh followers on social media)
बराक ओबामा बायडन-ट्रम्प यांच्यापेक्षा लोकप्रिय
जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या तुलनेत बराक ओबामांच्या फॉलोअर्सची संख्या अधिक आहे. बराक ओबामांचे ट्विटरवर 126 कोटी 94 लाख 2 हजार 13 फॉलोअर्स आहेत. ओबामा यांची लोकप्रियता ट्रम्प और बायडन यांच्यापेक्षा अधिक आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांची निवडणुकीवर 97 ट्विट
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निवडणूकीत घोटाळा झाल्याचा आरोप करत 97 ट्विट केली होती. ही ट्विटस ट्विटरकडून फ्लॅग करण्यात आली होती. मात्र, अमेरिकेतील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येबद्दल ट्रम्प यांनी एकही ट्विट केले नाही. (Donald Trump lost his two lakh followers on social media)
“अमेरिकेत कोरोनावरील लस उपलब्ध झाल्यानंतर लसीकरणासाठी अमेरीकन नागरिकांवर जबरदस्ती केली जाणार नाही.”, असं नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन म्हणाले आहेत.
बायडन म्हणाले की, “कोरोनावरील लस सर्वांसाठी अनिवार्य करणे गरजेचे नाही. मी राष्ट्राध्यक्ष म्हणून स्वतःची सर्व ताकद पणाला लावून लोकांसाठी आवश्यक ते सर्व निर्णय घेईन”. दरम्यान, प्यू रिसर्च सेंटरने दिलेल्या माहितीनुसार केवळ 60% अमेरीकन नागरिक कोरोनावरील लस घेण्यासाठी तयार आहेत. त्यामुळेच बायडन यांनी लसीकरण सर्वांसाठी अनिवार्य नसेल, असे वक्तव्य केले आहे.
येमेनमध्ये अडकलेले ‘ते’ मराठी तरुण मायदेशी परतले, धनंजय दातारांचाही मदतीचा हात#dhanajaydatar #yemen #indiancitizen #Dubai https://t.co/oaTf2YTzi5
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 6, 2020
संबंधित बातम्या
Donald Trump India Tour LIVE : अमेरिका भारताचा ‘सच्चा दोस्त’ : मोदी
डोनाल्ड ट्रम्प यांनी पराभव मान्य करण्याची वेळ आलीय, बराक ओबामांचे खडे बोल
(Donald Trump lost his two lakh followers on social media)