मुंबई : डोंगरीमधील काही लोकांनी कुख्यात गँगस्टार दाऊद इब्राहिमचा वाढदिवस (Dawood Ibrahim birthday celebration) साजरा केला. दाऊदचा वाढदिवस साजरा केल्याने डोंगरी पोलिसांनी कारवाई करत थेट काही लोकांना ताब्यात घेतले. पोलिसांनाही संशय आहे की 26 डिसेंबर रोजी डोंगरीत दाऊद इब्राहिमचा वाढदिवस साजरा (Dawood Ibrahim birthday celebration) करण्यात आला होता.
पोलिसांनी सोशल मीडियावर शेरा चिकना नावाचे एक अकाऊंट ट्रेस केले. ज्यामध्ये वेगवेगळे केक कापलेल्याचे फोटो आणि दाऊदचेही फोटो पोस्ट केले आहेत. तसेच हॅपी बर्थडे बॉस असे लिहिले होते. या आधारावर पोलिसांनी डोंगरी विभागातील अनेक मुलांना ताब्यात घेतले.
“डोंगरीत घडलेल्या घटनेचा आम्ही शोध घेत आहे. ही मुलं दाऊदसाठी काम करत असल्याची माहितीही आम्हाला मिळाली आहे. तसेच त्याच्या संपर्कात आहेत”, असं पोलीस सहआयुक्त संतोष रस्तोगी यांनी सांगितले.
फोटो पाहून असे वाटते की, या मुलांनी वेगवेगळे केक कापले आहेत. आता पोलीस याचा शोध घेत आहेत की यामध्ये कुणा कुणाचा समावेश होता.