मुंबई : यंदाच्या वर्षी शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण दिसत आहे. सूर्यग्रहण संपूर्ण भारतातून दिसत असून काही भागात कंकणाकृती, तर महाराष्ट्रासह काही भागात ते खंडग्रास स्थितीत दिसणार आहे. विशेष म्हणजे वर्षातील सर्वात मोठ्या दिवशी आणि सर्वात लहान रात्री ही खगोलीय घटना घडणार आहे. ही घटना पाहण्यासाठी अनेकजण उत्सूक आहेत. ही घटना डोळ्यात साठवण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, हे सूर्यग्रहण पाहताना नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असं आवाहन खगोलशास्त्रातील तज्ज्ञ सांगत आहेत (Dos and Donts of Solar Eclipse/Surya Grahan).
स्कायवॉच ग्रुपचे अध्यक्ष सुरेश चोपणे म्हणाले, “आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी सूर्यग्रहण चांगलं पाहायला मिळणार नाही. मात्र, जिथं चांगलं सूर्यग्रहण दिसेल, तेथे काही काळजी घ्यावी. जेव्हा चंद्राने सूर्य झाकला जातो तेव्हा सूर्याची किरणं सरळ आपल्या डोळ्यात येतात. यामुळे डोळ्याला इजा होऊ शकते. अनेक लोक सूर्यग्रहणामुळे डोळे खराब झाल्याचंही सांगतात. कुणीही दुर्बिणीने सूर्यग्रहण पाहू नये. त्याला फिल्टर लावलं तरच त्याचा उपयोग करावा. जर अशी साधनं नसतील तर बाजारात ग्रहण चष्मा मिळतो त्याचाही उपयोग करु शकता.”
Solar Eclipse Live | देशाच्या विविध भागातून टिपलेली सूर्यग्रहणाची विलोभनीय दृश्ये लाईव्ह
YouTube Live : https://t.co/D2qv4eGIHN #SolarEclipse2020 pic.twitter.com/5gti6O17vv— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2020
घरात पूर्ण काळी फिल्म असेल तर त्याचाही उपयोग करता येईल. वेल्डिंग ग्लासेसचा देखील ग्रहण पाहण्यासाठी उपयोग करता येईल. विद्यार्थ्यांसाठी ग्रहण पाहण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे पिन होल कॅमेरा. यातून विद्यार्थी सुरक्षितपणे ग्रहण पाहू शकतात, असंही चोपणे यांनी सांगितलं.
काय करावं?
1. सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार सूर्यग्रहण पाहताना सनग्लासचा उपयोग आवश्यक आहे.
2. झाडांच्या पानातून पडणाऱ्या प्रकाशाच्या मदतीने झाडांच्या सावलीत देखील ग्रहण पाहता येईल. जमीनीवर पडणाऱ्या सावलीत ग्रहणाची प्रतिमा पाहता येईल.
3. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी न पाहता त्याऐवजी वेल्डिंगसाठी वापरला जाणारा 13 किंवा 14 नंबरच्या चष्म्याचा उपयोग करावा.
काय करु नये
1. उघड्या डोळ्यांनी सूर्यग्रहण पाहण्याचा प्रयत्न करु नये. असं केल्यास याचा डोळ्यांवर विपरित परिणाम होऊ शकतो.
2. सूर्यग्रहण पाहताना काचेवर कोणत्याही प्रकारच्या सनग्लास, गॉगल किंवा एक्स-रे शिटचा उपयोग करु नये.
3. सूर्यग्रहणाची सावली पाण्याच्या पृष्ठभागावर पाहणे देखील धोकादायक आहे. तसं करणं टाळावं.
संबंधित बातम्या :
Solar Eclipse Live : ‘ग्रहण’ लागले, महाराष्ट्रातून खंडग्रास सूर्यग्रहणाचे दर्शन
PHOTO : शतकातील महत्त्वाचं सूर्यग्रहण, देशाच्या विविध भागातून टिपलेले सूर्यग्रहणाचे दुर्मिळ फोटो
Dos and Donts of Solar Eclipse Surya Grahan