मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 64 वा महापरिनिर्वाण दिन आहे. दरवर्षी यानिमित्ताने लाखो अनुयायी दादरच्या शिवाजी पार्कवरील चैत्यभूमीवर अभिवादन करण्यासाठी गर्दी करतात. मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमीवर न येता प्रत्येकाने घरात राहून डिजीटल माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे आवाहन राज्य सरकारसह पालिकेकडून करण्यात आले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वपक्षीय नेत्यांनी ट्वीट करत अभिवादन केलं. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Political leader Pays Tribute)
Remembering the great Dr. Babasaheb Ambedkar on Mahaparinirvan Diwas. His thoughts and ideals continue to give strength to millions. We are committed to fulfilling the dreams he had for our nation. pic.twitter.com/dJUwGjv3Z5
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2020
एक भविष्योन्मुखी व सर्वसमावेशी संविधान देकर देश में प्रगति, समृद्धि और समानता का मार्ग प्रशस्त करने वाले बाबासाहेब के महापरिनिर्वाण दिवस पर उन्हें कोटि-कोटि नमन।
बाबासाहेब के पदचिन्हों पर चलकर मोदी सरकार दशकों से विकास से वंचित वर्ग के कल्याण के प्रति समर्पित भाव से कार्यरत है। pic.twitter.com/1zJUVW1kwR
— Amit Shah (@AmitShah) December 6, 2020
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज चैत्यभूमी येथे जाऊन बाबासाहेबांच्या स्मारकास विनम्र अभिवादन केले. pic.twitter.com/hmmlf6DJAd
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) December 6, 2020
6 डिसेंबर 1956 ला बाबासाहेब गेले आणि समस्त भारतीय समाज पोरका झाला. क्रांतीसुर्य महामानव भारतरत्न डॉ.बाबसाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिवस.त्यांच्या प्रेरक स्मृतीस आणि धगधगत्या इतिहासास विनम्र अभिवादन..!! pic.twitter.com/7p0UTyCHEb
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2020
शोषित वंचित जनतेला संविधानाच्या माध्यमातून सन्मानाचं जगणं बहाल करणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य, महामानव, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/1iLNesFHpn
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) December 6, 2020
(Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Political leader Pays Tribute)
विषमतेच्या विषवल्लीने ग्रासलेल्या संस्कृतीला समतेची संजीवनी देणारे ; संविधानाचे शिल्पकार; भारताचे भाग्यविधाते; महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महावरीनिर्वाणदिनी त्यांच्या क्रांतिकारी स्मृतींना विनम्र अभिवादन!
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) December 6, 2020
अद्वितीय बुद्धिमत्ता, असामान्य विद्वत्ता, अफाट वाचन, कमालीचं संघटन कौशल्य, व्यवस्थेला झुगारून देण्याची ताकद ह्याच्या जोरावर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो वर्षांची गुलामगिरी नष्ट केली. ह्या महामानवाच्या स्मृतीस अभिवादन. pic.twitter.com/wsvB0cCiHf
— Rajeev Satav (@SATAVRAJEEV) December 6, 2020
“आयुष्य दीर्घ नाही महान असायला हवे ” असा विचार पेरून आजीवन बहुजन कल्याणाच्या हितस्तव सर्वसमावेशक वृत्तीने संघर्ष करणारे व समाजाला आदर्श जीवनाचा महामार्ग दाखविणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प्रज्ञासूर्य #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांना ६४ व्या #महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/JHdEMDouBj
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) December 6, 2020
विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना 64 व्या महापरिनिर्वाण दिनी आज सकाळी विनम्र अभिवादन केले. समता बंधुतेचा संदेश देणाऱ्या या महामानवाला माझ्यावतीने, राज्यातील आणि देशभरातील जनतेच्यावतीने अभिवादन करताना त्यांनी दाखविलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प केला.#mahaparinirvandiwas pic.twitter.com/eC69hqCyYW
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) December 6, 2020
समाजक्रांतीचे स्फुलींग चेतवून मुर्दाड झालेल्या समाजाला आपल्या हक्काप्रती जागृत करणारे महामानव डॉ.आंबेडकरांचे प्रेरणादायी विचार अनेक वर्षे आणि यापूढेही सतत प्रेरणा देत राहतील.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न बाबासाहेबांच्या स्मृतीस महापरिनिर्वाण दिनी विनम्र अभिवादन
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) December 6, 2020
सांविधानिक मूल्ये व आत्मभान देणारे प्रज्ञासूर्य महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना चैत्यभूमी, दादर येथे जाऊन आज महापरिनिर्वाण दिनी विनम्रपणे अभिवादन केले!#BhimraoAmbedkar#Ambedkar #बाबासाहेब_अमर_रहे pic.twitter.com/ojyLhgjp8U
— Sharad Pawar (@PawarSpeaks) December 6, 2020
चैत्यभूमीवरील सर्व कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या समाजमाध्यम खात्यांवरून आणि दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे. दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवरून सकाळी 7.45 ते 9 या कालावधीमध्ये शासकीय मानवंदना आणि हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात येईल. त्यानंतर, सकाळी 9.50, 10.50, 11.50 तसेच दुपारी 12.50 वाजता थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. महापरिनिर्वाणदिनी सोशल मीडियावरून ऑनलाईन थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. (Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Day Political leader Pays Tribute)
संबंधित बातम्या :