अंधेरीच्या राजाच्या मंडपात ड्रेस कोड लागू ,हे कपडे घालून याल तर..

| Updated on: Sep 05, 2024 | 4:43 PM

अंधेरीचा राजा नवसाला पावतो अशी भाविकाची श्रद्धा आहे, या बाप्पाचे विसर्जन इतर बाप्पाच्या विसर्जनाप्रमाणे अनंत चतुर्दशीला न होता स्वंतत्रपणे होते.

अंधेरीच्या राजाच्या मंडपात ड्रेस कोड लागू ,हे कपडे घालून याल तर..
Follow us on

अंधेरीचा राजा नवसाला पावतो असे म्हटले जाते. अंधेरीचा राजाच्या आझादनगर सार्वजनिक उत्सव समितीतर्फे गणेशोत्सव 2024 हे वर्षे साजरे केले जात आहे.या बाप्पााच्या दर्शनाला लांबून भक्त येत असतात. अंधेरीच्या राजाचा मुख दर्शन सोहळा आज मोठ्या धुमधडाक्यात पार पडला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही अंधेरीच्या राजाच्या दरबारात ड्रेस कोड ठेवण्यात आला आहे.या ड्रेस कोड नूसार भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे. जर भाविकांना योग्य ड्रेस परिधान केला नसेल तर त्यांच्यासाठी इतर कपड्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या ड्रेस कोडवरुन काही तरुण आण तरुणींचा आक्षेप देखील असू शकतो असे म्हटले जात आहे.

अंधेरी येथील नवसाला पावणारा राजाचा मुख दर्शन सोहळा आज झाला. या सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंधेरीच्या राजासाठी भव्य मंडप बांधण्यात आला आहे.या मंडपाचे डेकोरेशन राजस्थानच्या पाटवा हवेलीच्या धर्तीवर करण्यात आले आहे. या मंडपात भाविकांच्या सुरक्षेसाठी 72 सीसीटीव्ही कॅमेरे आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. दरवर्षी अनेक सेलिब्रिटी अंधेरीच्या राजाच्या दर्शनाला येत असतात. संकष्टी चतुर्थीच्या शुभदिनी 21 सप्टेंबर 2024 रोजी संध्याकाळी 6 वाजता अंधेरीच्या राजाचा विसर्जन सोहळा पार पडणार आहे. मुंबईतील इतर गणेशांचे विसर्जन अनंत चतुर्दशीला होत असले तर अंधेरीच्या राजाचे विसर्जन 21 सप्टेंबर रोजी होणार आहे.

असा आहे ड्रेस कोड

‘अंधेरीच्या राजाचे’ दर्शन घ्यायचे असेल तर विशेष ड्रेस कोड असणार आहे. या मंडपात हाफ पँट आणि स्कर्ट परिधान करून येणार्‍यांसाठी दर्शनासाठी पुरुषांसाठी लुंगी आणि महिलांसाठी फूल पॅंट ठेवण्यात आली आहे. लुंगी किंवा फूल पँट परिधान करून गेल्यावरच बाप्पाचं दर्शन घेता येणार आहे. या गणेश मंडळाने हा नियम 16 वर्षांपूर्वी लागू केला असून तो दरवर्षी पाळला जातो.