मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात अनेक बडे बॉलिवूड कलाकार अडकले आहेत. या प्रकरणी एनसीबीने अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही चौकशी केली होती. दीपिका पदुकोण (Deepika Padukone) आणि तिची मॅनेजर करिश्मा प्रकाश (Karishma Prakash) यांच्या दरम्यान झालेले ड्रग्ज चॅट एनसीबीच्या हाती लागले होते. यानंतर करिश्माच्या घरातदेखील ड्रग्ज आढळले आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून करिश्मा फरार आहे. यानंतर आता दीपिकाने करिश्माला कामावरून कमी केल्याचे कळते आहे.(Drug Connection Deepika Padukone Fired manager Karishma Prakash)
करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याची भीती वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले आहे. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.
Bollywood actor Deepika Padukone’s manager Karishma Prakash, who has been summoned by Narcotics Control Bureau in a drug case, has not appeared for questioning and remains “untraceable”: Police official
— Press Trust of India (@PTI_News) November 2, 2020
करिश्मा प्रकाशच्या घरावर एनसीबीने छापा टाकला होता. या दरम्यान तिच्या घरात काही ड्रग्ज आढळून आले आहेत. समन्स बजावूनही चौकशीसाठी हजर न राहिल्याने एनसीबीने करिश्मा विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, या सगळ्या दरम्यान करिश्मा फरार झाली आहे. अटकेच्या भीतीने तिने कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. याच बरोबर तिने नोकरीचा राजीनामा देखील दिला आहे.(Drug Connection Deepika Padukone Fired manager Karishma Prakash)
करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने आता पुन्हा एकदा आपण एनसीबी चौकशीच्या फेऱ्यात अडकू या भीतीने दीपिकानेच तिला कामावरून काढून टाकले, अशी चर्चा सध्या सुरू आहे. मात्र, दीपिकाचे पाऊल तिच्या अडचणीत वाढ करू शकते. कामवरून कमी झाल्यानंतर करिश्मा अनेक गौप्यस्फोट करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी (27 ऑक्टोबर) दिवसभर तिच्या घरी एनसीबीची कारवाई सुरु होती. घरात ड्रग्ज सापडल्यानंतर करिश्मा प्रकाश हिच्यावर तत्काळ गुन्हाही दाखल करण्यात आला. एनसीबीचे अधिकारी करिश्माच्या घरी गेले तेव्हा ती घरात नव्हती. यानंतर अधिकाऱ्यांनी करिश्माच्या कुटुंबीयांकडे चौकशीसाठीचे समन्स देण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिच्या कुटुंबीयांनी हे समन्स स्वीकारायला नकार दिला. त्यामुळे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हे समन्स करिश्मा प्रकाशच्या घराच्या दारावर चिकटवले. यानंतर एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून तिचा शोध सुरु आहे. यामुळे आता या संपूर्ण प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.
(Drug Connection Deepika Padukone Fired manager Karishma Prakash)