मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण हिची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशची ड्रग्ज प्रकरणी (Drugs Connection) एनसीबीकडून चौकशी सुरू झाली आहे. इतके दिवस सगळ्यांपासून लपण्याचा प्रयत्न करणारी करिश्मा (Karishma Prakash) अखेर एनसीबीसमोर हजर झाली आहे. मागील काही दिवसांपासून एनसीबी करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात समन्स बजावत होती. मात्र, करिश्मा एनसीबीसमोर हजर होत नव्हती. इतके दिवस ती कुठे होती याची माहिती अद्याप उघड झालेली नाही.(Drugs connection Deepika padukone ex manager karishma Prakash at NCB office)
करिश्मा प्रकाश दीपिका पादुकोणची मॅनेजर होती. ती क्वान कंपनीच्या वतीने दीपिकाचे काम सांभाळत होती. एनसीबीने अलीकडेच तिच्या घरावर छापा टाकून ड्रग्ज जप्त केले होते. त्यानंतर ती पुन्हा एकदा एनसीबीच्या रडारवर आली.
आजच्या चौकशीत जर करिश्माने दीपिकाचे नाव घेतले, तर कदाचित एनसीबीच्या तपासाची सुई पुन्हा एकदा दीपिकाकडे वळू शकते.
बॉलिवूड ड्रग्स प्रकरणात अभिनेत्री दीपिका पदुकोणची माजी मॅनेजर करिश्मा प्रकाशला मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सेशन कोर्टाने करिश्मा प्रकाशला शनिवारपर्यंत अटक करू नये, असा आदेश दिला होता. यावेळी न्यायालयाने करिश्मा प्रकाशला देखील एनसीबीच्या चौकशीला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.(Drugs connection Deepika padukone ex manager karishma Prakash at NCB office)
Karishma Prakash, manager of actor Deepika Padukone, files anticipatory bail application before special NDPS court in Mumbai.
Prakash was recently summoned by the Narcotics Control Bureau, but she didn’t appear before the agency.
— ANI (@ANI) October 31, 2020
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात 27 ऑक्टोबर रोजी करिश्मा प्रकाश हिच्या घरावर धाड टाकली होती. या धाडीत त्यांना 1.7 ग्रॅम हशीष ड्रग्स आणि भारतात बंदी असलेल्या सीबीडी ऑइलच्या (CBD Oil) 2 बाटल्या सापडल्या होत्या. याबाबत एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात करिश्माला चौकशीसाठी हजर राहण्याबाबत 27 ऑक्टोबर रोजी समन्स देण्यात आले होते. तसेच 28 ऑक्टोबर रोजी हजर राहण्यासाठी सांगण्यात आले होते. मात्र,करिश्मा चौकशीसाठी हजर राहिली नाही. उलट तिने 29 ऑक्टोबर रोजी मुंबई सेशन कोर्टात धाव घेतली.
मुंबई सेशन कोर्टात 3 नोव्हेंबरला तिच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने शनिवारपर्यंत (7 नोव्हेंबर) करिश्माला अटक न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, करिश्माला चौकशीसाठी एनसीबीचे अधिकारी बोलवतील तेव्हा हजर रहावे लागणार आहे. 7 नोव्हेंबर रोजी कोर्ट करिश्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर अंतिम निर्णय देणार आहे.(Drugs connection Deepika padukone ex manager karishma Prakash at NCB office)
करिश्माच्या घरात ड्रग्ज आढळल्याने एनसीबीने तिला चौकशीसाठी हजर राहण्यासाठी दोन वेळा समन्स पाठविला होता. मात्र, दोनदा समन्स पाठवूनही करिश्मा या चौकशीला हजर राहिली नाही. यामुळे एनसीबीने तिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, करिश्मा गेल्या काही दिवसांपासून गायब असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर पुन्हा एकदा एनसीबीच्या चौकशीत अडकण्याची भीती वाटल्याने दीपिकाने तिला थेट कामावरूनच काढून टाकले आहे. करिश्माने स्वतःहून राजीनामा दिला असला तरी दीपिकानेच तिला काढल्याची चर्चा रंगली आहे.
(Drugs connection Deepika padukone ex manager karishma Prakash at NCB office)