मुंबई : मुंबई क्राईम ब्रँचच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांनी (Mumbai Crime Branch) दोन कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त केले आहेत. मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी धारावी परिसरात ही कारवाई केली (Mumbai Crime Branch).
अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे पोलीस निरीक्षक शशांक शेळके आणि सहायक पोलीस निरीक्षक विशाल खैरे यांना धारावी परिसरात एक व्यक्ती अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला होता. यावेळी एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.
त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याजवळ 1 किलो 200 ग्राम वजनाचे हेरॉईन सापडलं. या ड्रग्सची किंमत अंतर राष्ट्रीय बाजारात सुमारे दोन कोटी चाळीस लाख रुपये आहे. चौकशीसाठी ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव मंझार दिन मोहम्मद शेख आहे. तो तस्कर असल्याची माहिती तपासात उघडकीस आली आहे.
मंझार याला अटक करण्यात आली आहे. मंझार हा ड्रग्सचा मोठा तस्कर आहे. त्याच्या विरोधात यापूर्वीही तस्करीचे गुन्हे दाखल आहेत.
कोल्हापुरात मोबाईलचं दुकान फोडलं, साडे 16 लाखांचा मुद्देमाल लंपासhttps://t.co/jeoJ8bNVeq
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 13, 2020
Mumbai Crime Branch
संबंधित बातम्या :
पनवेलमध्ये खवल्या मांजरांची तस्करी, पाच जणांना अटक, वनविभागाची यशस्वी कारवाई
Phone Pe आणि PayTm च्या मदतीने फसवणूक, चोरलेले 6 लाख 46 हजार रुपये पोलिसांनी परत मिळवले