नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीने सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. विशेषत: डिलीव्हरी क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांना याचा मोठा फटका बसला आहे. फूड डिलीव्हरीमध्ये अग्रेसर असलेल्या झोमॅटो कंपनीला इंधन दरवाढीला सामोरे जातच ग्राहकांना वेळीच सेवा देण्याचे व्रत जोपासावे लागत आहे. त्यामुळे कंपनीने आता आपल्या रायडर्सच्या म्हणजेच वाहनचालकांच्या पगारवाढीची घोषणा केली आहे. (due to fuel price hike zomato will increase Riders’ salary)
देशातील पेट्रोलच्या वाढत्या किंमती लक्षात घेत कंपनीला कर्मचार्यांच्या पगारवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. देशातील इंधनाच्या किंमती गेल्या 10 दिवसांपासून सतत वाढत आहेत. एकट्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 90.93 रुपये आहे तर डिझेलची किंमत 81.32 रुपये आहे. त्याचबरोबर मुंबईतील पेट्रोलची किंमत 97.34 रुपये आहे तर डिझेलची किंमत 88.44 रुपये आहे.
झोमॅटोचे चालक दिवसातून 100 ते 200 किमी प्रवास करतात. अशा परिस्थितीत प्रत्येक चालकावर पेट्रोलवर दरमहा 800 रुपये खर्च करावा लागत आहे. हा खर्च करून पगार हाती किती येणार, असा प्रश्न वाहनचालकांना सतावत आहे. याच पार्श्वभूमीवर आम्ही रायडर्सचा पगार वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कर्मचार्यांना काहीअंशी तरी दिलासा मिळेल. याबाबत झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी मोहित सरदाना यांनी सांगितले की, तेलाच्या वाढत्या किंमतींचा उत्पन्नावर कसा परिणाम होतो याची आम्हाला जाणीव आहे. अशा परिस्थितीत आम्ही आमच्या डिलिव्हर पार्टनर्सच्या पगारामध्ये 7 ते 8 टक्क्यांनी वाढ करणार आहोत. आम्ही यापूर्वीच देशातील 40 शहरांमध्ये ही घोषणा केली आहे. येत्या आठवड्यात आम्ही इतर शहरांमध्येही पगारवाढ लागू करू, असेही सरदाना यांनी स्पष्ट केले.
झोमॅटोने पगारवाढीच्या निर्णयाची घोषणा केली आहे. मात्र या निर्णयावर रायडर्स खूश नसल्याचे वृत्त आहे. इंधनाचे दर ज्या प्रमाणात वाढले आहेत, त्या कंपनीने योग्य पद्धतीने विचार करून आणखी पगार वाढवावा, असे रायडर्सचे म्हणणे आहे. प्रत्येक शहराच्या अनुसार प्रत्येक रायडर्सना वेगवेगळ्या प्रकारचे पैसे मिळतील. त्याचबरोबर कंपनीत किती वर्षे सेवा केली आहे, याचाही पगारवाढ लागू करताना विचार करण्यात यावा, असे मत रायडर्सनी व्यक्त केले आहे. आजकाल पेट्रोलवर खूप खर्च करावा लागत आहे़ तसेच कोरोना महामारीमुळे ऑर्डरदेखील कमी आहेत. त्यात महागाईही आहे. अशा परिस्थितीत कुटुंब सांभाळणे नाकीनाऊ येत आहे. त्यामुळे कंपनीने पुरेशी पगारवाढ करावी, असा सूर रायडर्सकडून आळवला जात आहे. (due to fuel price hike zomato will increase Riders’ salary)
India vs England 3 rd Test | अवघ्या 12 तासात 30 विकेट्स, दुसऱ्या दिवशीच सामना निकाली, कॅप्टन विराटची पीचवर प्रतिक्रिया, म्हणाला……https://t.co/UtB5jwTHIa#IndiavsEngland2021 | #IndiavsEngland | #ViratKohli | #AhmedabadTest |
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 26, 2021
इतर बातम्या