जयपूर : पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय वायूसेनेने पाकिस्तानच्या बालाकोट दहशतवादी तळावर बॉम्ब हल्ला केला. भारतीय सैन्याने पुलवामा हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानला चोख असं उत्तर दिलं. या हल्ल्यानंतर भारतात सर्वत्र आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणी रस्त्या-रस्त्यावर ‘भारत माती की जय’चे नारे दिले जात आहेत, तर कुठे मिठाई आणि फटाके फोडून आनंद साजरा केला जात आहे. याच दरम्यान राजस्थानच्या सैनिक कुटुंबात एका मुलाचा जन्म झाला आहे. त्याचे नाव मिराज सिंह असं ठेवण्यात आलं आहे.
राजस्थानच्या निगौर जिल्ह्यातील डाबडा गावात राहणाऱ्या महावीर सिंह यांची पत्नी सोनम यांना प्रसूती वेदनेनंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी त्यांनी एका मुलाला जन्म दिला आहे. त्याचा जन्म अशा वेळी झाला ज्यावेळी भारतीय वायूसेनेने पाकिस्तानवर हल्ला केला. त्यामुळे या मुलाचे नाव मिराज सिंह असे ठेवण्यात आलं आहे. सध्या या बाळाच्या नावावरुन संपूर्ण देशभर चर्चा सुरु आहे.
हे वाचा : पाकवर बॉम्ब टाकणारं ‘मिराज 2000’ नेमकं काय आहे?
पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर जोरदार बॉम्ब हल्ला केला. या एअरस्ट्राईकमध्ये 300 दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. या सर्व हल्ल्यात वायूसेनेच्या 12 विमानांनी उत्तम कामगिरी केली आहे. या विमानांनी पाकिस्तानवर बॉम्ब हल्ला केला आणि लेझर गाईड बॉम्ब टाकले. या हल्ल्यामुळे दहशतवाद्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
व्हिडीओ : दोन दहशतवाद्यांचा खात्मा, काश्मीरच्या शोपियांमध्ये भारतीय जवानांची मोठी कारवाई