नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी (12 एप्रिल) सायंकाळी तीव्र भूकंपाचे धक्के बसले (Earthquake in Delhi NCR). अचानक सुरु झालेल्या भूकंपाच्या धक्क्यांमुळे दिल्लीतील लोक घाबरुन घराबाहेर पडले. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी नागरिकांना घराबाहेर पडण्याची परवानगी नव्हती. मात्र, भूकंपाने लोक आपला जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पडले. गाजियाबादमध्ये देखील भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रविवारी सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी या भूकंपाच्या धक्क्यांना सुरुवात झाली. याची तीव्रता 3.5 रिश्टर इतकी होती.
Epicentre of the earthquake in East Delhi, 3.5 on richter scale: IMD https://t.co/uTfshQkYh3
— ANI (@ANI) April 12, 2020
दिल्ली-एनसीआरमध्ये आलेल्या या भूकंपाचा केंद्रबिंदू कोठे होता हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाही. आत्तापर्यंत भूकंपात कोणत्याही जीवितहानी अथवा वित्तहानीचीही माहिती समोर आलेली नाही. या भूकंपानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांच्या सुरक्षेबाबत प्रार्थना केली आहे. ते आपल्या ट्विटमध्ये म्हटले, “दिल्लीत भूकंपाचे धक्के बसले आहेत. तुम्ही सर्व सुरक्षित असाल अशी मी आशा करतो. तुमच्या सर्वांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो.”
Tremors felt in Delhi. Hope everyone is safe. I pray for the safety of each one of you.
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) April 12, 2020
भूकंपानंतर दिल्लीची उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी देखील ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कोरोना कमी होता की काय म्हणून आता भूकंप आला आहे? देवा तुझ्या मनात नेमकं काय आहे? असं मत सिसोदिया यांनी व्यक्त केलं.
कोरोना कम था जो भूकम्प भी मचा दिया…. क्या मन में है देवा?
— Manish Sisodia (@msisodia) April 12, 2020
भूकंप का येतो?
पृथ्वीच्या भूगर्भात एकूण 7 प्लेट्स सातत्याने हालचाल करत असतात. या प्लेट्स ज्या ठिकाणी एकमेकांवर आदळतात त्या ठिकाणाला ‘फॉल्ट लाईन झोन’ म्हणतात. या प्लेट्स वारंवार आदळल्याने तेथे दबाव तयार होतो. त्यामुळे या प्लेट्सचे तुकडेही होतात. यावेळी प्लेट्समधून बाहेर पडलेली उर्जा बाहेर पडण्याची जागा शोधते. अखेर ही उर्जा भूकंपाच्या माध्यमातून पृथ्वीच्या भूगर्भातून बाहेर पडते.
संबंधित बातम्या :
कोरोनाचा कहर, देशात 24 तासात 909 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांचा आकडा 8,356 वर
औरंगाबादमध्ये शेततळ्यात पोहायला गेलेल्या 5 जणांचा बुडून मृत्यू
‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या
जिथे आहे तिथेच थांबा; तुमच्या राहण्या-खाण्याची हमी आमची : अनिल देशमुख
पुण्यात विळखा घट्ट, भवानी पेठेत 56 कोरोनाग्रस्त, कोणत्या वॉर्डमध्ये किती रुग्ण?
Earthquake in Delhi NCR