Rana Kapoor | ‘YES बँके’चे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावर ईडीची धाड

| Updated on: Mar 07, 2020 | 10:35 AM

येस बँकचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर यांच्या घरावर काल (6 मार्च) रात्री ईडीने (प्रवर्तन निदेशालय) धाड (ED Raid on Rana Kapoor Home) टाकली.

Rana Kapoor |  YES बँकेचे माजी सीईओ राणा कपूर यांच्यावर ईडीची धाड
Follow us on

मुंबई : YES बँकेचे संस्थापक आणि माजी सीईओ राणा कपूर (ED Raid on Yes Banks Rana Kapoor Home) यांची गेल्या 12 तासांपासून चौकशी सुरुच आहे. ईडीने शुक्रवारी 6 मार्चला रात्री राणा कपूर यांच्या घरावर धाड टाकून चौकशी सुरु केली. (ED Raid on Yes Banks Rana Kapoor Home)  राणा कपूर यांच्याविरोधात पैशाची अफरातफर अर्थात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईडीने त्यांना लूकआऊट नोटीस जारी केल्याने, त्यांना आता देशाबाहेर जाता येणार नाही.

राणा कपूर यांचे वरळीमध्ये घर आहे. वरळीतील समुद्र महल या अलिशान इमारतीत राहतात. ईडीने काल रात्री अचानक राणा कपूर यांच्या घरावर धाड टाकली. रात्रभर ईडीने त्यांची चौकशी केली. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीने ही धाड टाकली आहे.

राणा यांनी येस बँकेतून स्वत: च्या मर्जीने जवळच्या लोकांना मोठे कर्ज दिल्याचा आरोप आहे. 2017 मध्ये येस बँकेने 6 हजार 355 कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. याबद्दल ईडीकडून चौकशी सुरु आहे, अशी माहिती मिळत आहे.

राणा यांच्या बिल्डिंगमध्ये नीरव मोदीचा फ्लॅट

वरळीतील समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचे घर आहे. यामध्ये देशातील अनेक दिग्गज उद्योजकांची घरं आहेत. पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदीचाही येथे फ्लॅट आहे. याशिवाय काही नामांकित कंपन्यांचे गेस्ट हाऊसही या बिल्डिंगमध्ये आहे.

येस बँकेवर निर्बंध

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने येस बँकेवर निर्बंध आणले आहेत. येस बँकेच्या खातेदारांना आता केवळ 50 हजार रुपयेच काढता येणार आहेत. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, 5 मार्चपासून (Yes Bank Withdrawal Limit)  3 एप्रिलपर्यंत हे निर्बंध लावण्यात आले आहेत.  शिक्षण, आरोग्य आणि लग्न असेल तरच अधिक रक्कम काढण्याची मुभा आहे. बँकेच्या ढासळलेल्या आर्थिक परिस्थितीला पाहता RBI ने हा निर्णय घेतला आहे. तसेच, SBI चे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांना YES बँकेचे संचालक म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे.

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढला

YES बँकेवर कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे बँकेची आर्थिक परिस्थिती ढासळली आहे. भारतीय स्टेट बँक आणि इतर आर्थिक संस्था YES बँकेला या संकटातून बाहेर काढू शकतात, अशी माहिती सूत्रांनी गुरुवारी (5 मार्च) दिली. एसबीआयला यासाठी केंद्राकडून परवानगी देण्यात आल्याचंही सूत्रांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या 

YES बँकेवरील निर्बंधाचा फटका, पिंपरी चिंचवड मनपाचे तब्बल 983 कोटी रुपये अडकले   

YES बँकेवर आरबीआयचे निर्बंध, ग्राहकांना 50 हजारच काढता येणार