कोल्हापूर : विद्यापीठांच्या अंतिम परीक्षेच्या निर्णयावरुन राज्य सरकार विरुद्ध केंद्र सरकार अशी परिस्थिती (Uday Samant On Final Year Exam) सध्या दिसत आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षेवरुन कोणीही राजकारण करु नये. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, असे राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. मुलांच्या परीक्षेबाबत पालकांनी चिंता करु नये, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार आहे, असेही सामंतांनी यावेळी सांगितले.
“राज्य सरकारने आताचा परिस्थितीत परीक्षा घेणे शक्य नाही, अशा निर्णय दोन वेळा घेतला आहे. मात्र राज्य सरकाला परीक्षाच घ्यायची नाही हा समज चुकीचा आहे. कोरोनाचं संकट अचानक दूर होणार आहे का?” असा सवालही उदय सामंत यांनी विचारला.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“युजीसीने राज्यातील सर्व विद्यापीठांचा आढावा घ्यावा. राज्यातील रेड झोनमधील विद्यार्थी कसे काय येऊन परीक्षा देतात ते युजीसीने सांगावे,” अशीही मागणी उदय सामंत यांनी (Uday Samant On Final Year Exam) केली.
“कोरोना गेल्यानंतर गुणवत्ता दाखवण्यासाठी आम्ही परीक्षेची व्यवस्था केली आहे. राज्यातील सर्व कुलगुरुंशी चर्चा करुन याबाबतचा निर्णय सरकारने घेतला आहे. प्रश्नपत्रिका तयार करणं, उत्तरपत्रिका तपासणं हे काम काय रोबो करु शकणार नाही. त्यामुळे सप्टेंबर शेवटच्या आठवड्यात परीक्षा घेणं शक्य नाही,” असे उदय सामंत यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.
“विद्यार्थ्यांच्या परीक्षेवरुन कोणीही राजकारण करु नये. हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे. मी 60 जीआर काढून ते मागे घेतले नाही. मी एकच जीआर काढला आणि त्याच्या मागे लागलो,” असे प्रत्युत्तरही उदय सामंत यांनी भाजप नेते विनोद तावडे यांना दिले.
सीमा भागात मराठी महाविद्यालय सुरु करणार
तसेच “सीमा भागातील मराठी नागरिकांना ताकद देण्यासाठी मराठी अभ्यासक्रम तातडीने सुरु करणार आहे. तसेच सीमा भागात राज्य सरकार मराठी महाविद्यालय सुरु करणार आहे,” असेही उदय सामंत यांनी (Uday Samant On Final Year Exam) सांगितले.
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आज महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी भाषिकांसाठी शैक्षणिक उपक्रम चालू कारण्यासंदर्भात बैठक पार पडली.. ह्यावर्षी पासून सीमाभागात शैक्षणिक उपक्रम सुरु करण्याचे निश्चित करण्यांत आले pic.twitter.com/j3dOX4lc1G
— Uday Samant (@samant_uday) July 19, 2020
संबंधित बातम्या :
वाईन शॉपची तुलना विद्यापीठांशी कशाला? परीक्षा घेऊ शकत नाही, ठाकरे सरकारची रोखठोक भूमिका
एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार? 13 कुलगुरुंच्या समितीची राज्य सरकारला शिफारस