कल्याण : देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात (Separate corona lab in kalyan-dombivali) आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्येही दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत आहे. यावर रोख मिळवण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून कल्याण-डोंबिवली महापालिकाहद्दीत स्वतंत्र कोरोना लॅब उभारण्यात येत आहे. या लॅबसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मंजुरी (Separate corona lab in kalyan-dombivali) दिली आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत अधिकाधिक संख्येने कोरोना रुग्णांची तपासणी व्हावी, यासाठी कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे पाठपुरावा करत होते. अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
कल्याण-डोंबिवलीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर आढळून येत असून इथे स्थानिक पातळीवर लॅब असणे आवश्यक आहे. सध्या संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी मुंबई येथील केईएम रुग्णालय आणि जेजे रुग्णालयात पाठवावे लागत होते. त्यामुळे अहवाल येण्यास वेळ लागत होता आणि उपचारांमध्ये अडचणी येत होत्या. यासाठीच कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना तपासणीची स्वतंत्र लॅब असावी, अशी मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली होती.
यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याणचे आमदार राजू पाटील यांनीही कल्याण-डोंबिवलीमध्ये स्वतंत्र टेस्टिंग लॅबची मागणी केली होती. कल्याण-डोंबिवलीमध्ये रुग्ण वाढत असल्याने राजू पाटील यांनी ही मागणी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली होती.
कल्याण-डोबिंवलीमध्ये आतापर्यत 100 पेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे येथील विभागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान, राज्यात आतापर्यंत 5649 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर देशात 16 हजारपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 681 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर 4257 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
संबंधित बातम्या :
कल्याण-डोंबिवलीत कोरोनाग्रस्त वाढले, मनसे आमदाराची मुख्यमंत्र्यांकडे टेस्टिंग लॅबची मागणी
Corona | राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढली, कोरोनाचे कुठे किती रुग्ण?