एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कोण सरस?; एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?

| Updated on: Nov 20, 2024 | 7:16 PM

विधानसभेच्या 288 उमेदवारांचे भवितव्य आज बुधवारी झालेल्या मतदानात मतपेटीत बंद झालेले आहे.राज्यात आज झालेल्या मतदानानंतर आता एक्झिट पोलचे निकाल जाहीर झालेले आहे. त्यामुळे या एक्झिट पोल नुसार एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरस की ठाकरे यांची शिवसेना सरस ठरणार हे पाहा...

एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे? कोण सरस?; एक्झिट पोलमध्ये कुणाला किती जागा?
Follow us on

महाराष्ट्राच्या विधान सभेच्या 288 जागांचे मतदान पार पडलेले आहे. या नंतर मतदानानंतरच्या चाचणीचे म्हणजे एक्झिट पोलचे आकडे समोर आलेले आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये झालेल्या फूटीनंतर ही विधान सभा निवडणूक होत असल्याने यात कोणता पक्ष खरा आणि कोणता पक्ष खोटा याचा फैसला जनतेचा हातात असून 23 तारखेला हा निकाल प्रत्यक्षात हाती येणार आहे. त्यापूर्वी पोल डायरी या संस्थेने केलेल्या एक्झिट पोल अंदाजामध्ये भाजपा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येत आहे. भाजपाला 77 ते 108 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तर शिवसेनेला 27 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 18 ते 28 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना सरस?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पोल डायरी एक्झिट पोल नुसार 27 ते 50 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 16 ते 35 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसला 25 ते 39 जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आला आहे. तर इतरांना 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज पोल डायरी एक्झिट पोलने वर्तवविला आहे. पोल डायरी एक्झिट पोल नुसार एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांच्या पेक्षा जास्त जागा मिळणार असे म्हटलेले आहे.

हे सुद्धा वाचा

महायुतीला बहुमत मिळणार

पोल डायरी एक्झिट पोल नुसार महायुतीला 122 ते 186 जागा मिळून महायुतीला बहुमत मिळणार असे म्हटले आहे. तर महाविकास आघाडीला या पोलनुसार 69 ते 121 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे तर इतरांना या पोलनुसार 12 ते 29 जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.