मुंबई: पाकिस्तानचे सुफी गायक राहत फतेह अली खान (Rahat Fateh Ali Khan) यांच्यावर भारतात परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्यामुळे अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने राहत फतेह अली खान यांना नोटीस पाठवली आहे. राहत फतेह अली खान यांनी भारतात तीन वर्षांपासून परकीय चलनाची तस्करी केल्याचा आरोप आहे. राहत फतेह अली खान यांना अवैध पद्धतीने तीन लाख 40 हजार अमेरिकन डॉलर मिळाले होते. यापैकी 2 लाख 25 हजार डॉलरची तस्करी केल्याचा आरोप आहे.
याप्रकरणी चौकशी करत असलेल्या ईडीने राहत अलींना कारणे दाखवा नोटीस पाठवून उत्तर मागितलं आहे. राहत अलींकडे 2 कोटी 61 लाख रुपयांचा हिशेब मागितला आहे. जर ईडीच्या चौकशीत राहत फतेह अली खान दोषी आढळले तर त्यांच्यावर 300 पट दंड ठोठावला जाऊ शकतो. इतकंच नाही तर त्यांच्या भारतातील कार्यक्रमांवर बंदी येऊ शकते.
राहत फतेह अली खान हे भारतातील सर्वात मोठे मांस व्यावसायिक मोईन कुरेशींच्या मुलीच्या लग्नात आले होते. मोईन कुरेशी हे तेच व्यावसायिक आहे, ज्यांच्यामुळे सीबीआयमधील वरिष्ठांचा वाद समोर आला.
राहत फतेह अली खान यांच्यावर आरोप काय?
– राहत फतेह अली खान यांच्यावर सर्वात मोठा आरोप परकीय चलन तस्करीचा आहे
– भारतात तीन वर्ष परकीय चलनाची तस्करी
– अवैध तीन लाख 40 हजार यूएस डॉलर मिळाले, त्यापैकी 2 लाख 25 हजार डॉलरची तस्करी
– ईडीने 2 कोटी 61 लाख रुपयांचा हिशेब मागितला
कोण आहेत राहत फतेह अली खान?
– राहत फतेह अली खान हे पाकिस्तानचे लोकप्रिय सूफी गायक आहेत.
– राहत फतेह अली खान यांनी भारतात बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गायिली
– मेरे रशके कमर, जग घुमिया, आज दिन चढिया, ओ रे पिया, तेरे मस्त मस्त दो नैन, ही गाणी प्रसिद्ध
– भारतात राहत फतेंचे अनेक फॅन आहेत.