पुणे : लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे बंद झाले, तर अनेकांचे आर्थिक व्यवहार कोलमडले. यामुळे अनेकांना आपल्या नोकऱ्याही गमवाव्या लागल्या. ज्यांच्या नोकऱ्या वाचल्या त्यांना वेतनकपातीला सामोरं जावं लागलं. याच पार्श्वभूमीवर पुण्यात आर्थिक फटका बसलेला इस्टेट एजंट थेट सोनसाखळी चोर बनल्याचं पाहायला मिळालं आहे (Pune Estate agent become chain snatcher). या इस्टेट एजंटने सोनसाखळी चोरली, मात्र पोलिसांनी सोनसाखळीसह या चोराच्या एका तासातच मुसक्या आवळल्या. या कारवाईत 75 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इस्टेट एजंटचा सोनसाखळी चोर झालेल्या या व्यक्तीचं नाव मोहम्मद अतिफ इक्बाल शेख असं आहे. या प्रकरणी न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. समर्थ पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. सोनसाखळी चोरी सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्यानं पोलिसांनी तात्काळ भामट्याचा माग काढला. 26 वर्षीय मोहम्मद हा उंड्री परिसरात फिनिक्स वृंदावन या सोसायटीत राहतो. नाना पेठेतील टक्कार गल्लीत तो रिअल इस्टेटचा व्यवसाय करत होता. मात्र लॉकडाऊनची झळ बसल्याने तो सोनसाखळी चोरी करत होता.
बुधवारी (1 जुलै) दुपारी त्यांनं घर काम करणाऱ्या 60 वर्षे महिलेचं मंगळसूत्र हिसकावलं. त्याने रास्ता पेठेतून घरी जात असताना दुचाकीवरुनच मंगळसूत्र लांबवलं. यानंतर तो भक्ती भावना ज्वेलर्समध्ये सोनसाखळी विकण्यासाठी आला होता. याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून त्याच्या मुसक्या आवळल्या. या कारवाईत 35 हजारांचं मंगळसूत्र आणि दुचाकी जप्त करण्यात आली. सोनसाखळी चोरी प्रकरणी मोहम्मदला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
हेही वाचा :
मृत्यू कोणाच्या हातात नाही, जन्माला आला तो मरणारच, एखादाच माझ्यासारखा असतो, जो… : उदयनराजे भोसले
कोरोना नियंत्रणासाठी मुंबईप्रमाणेच प्रत्येक जिल्ह्यात टास्क फोर्स, अमित देशमुखांची घोषणा
Pune Estate agent become chain snatcher