मुंबई : इलेक्ट्रिक व्हेईकल स्टार्ट-अप कंपनी Rissala Electric Motors ने इलेक्ट्रिक टू-व्हीलर ब्रांड Evolet लाँच केला (Indias first Electric Quad-bike). या ब्रांड अंतर्गत कंपनीने 3 ई-स्कूटर आणि 1 ई-क्वॉड-बाईक लाँच केली (Evolet three electric scooters).
ई-स्कूटरला Polo Pony, Polo आणि Derby या नावाने बाजारात उतरवण्यात आलं. या तीनही ई-स्कूटर दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहेत. तर ई-क्वॉड-बाईकचं नाव Warrior आहे. ही देशातील पहिली इलेक्ट्रिक क्वॉड-बाईक आहे.
Polo Pony इलेक्ट्रिक स्कूटर : ही ई-स्कूटर दोन व्हेरिएंट EZ आणि Classic मध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे 39,499 रुपये आणि 49,499 रुपये आहे. EZ व्हेरिएंटमध्ये 48 V/24 Ah वॉल्व्ह-रेगुलेटेड लीड अॅसिड (VRLA) बॅटरी देण्यात आली आहे. तर Classic मध्ये 48 V/24 Ah लिथीअम-आयन बॅटरी देण्यात आली आहे.
Polo इलेक्ट्रिक स्कूटर : ही ई-स्कूटरही EZ आणि Classic मध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे 44,499 आणि 54,499 रुपये आहे. EZ मध्ये 48 V/24 Ah वॉल्व्ह-रेगुलेटेड लेड अॅसिड (VRLA) बॅटरी आणि क्लासिक व्हेरिएंटमध्ये 48 V/24 Ah लिथीअम-आयन बॅटरी आहे.
Derby इलेक्ट्रिक स्कूटर : शार्प आणि मस्क्युलर डिझाईन असलेली Derby ई-स्कूटरही दोन व्हेरिएंट EZ आणि Classic मध्ये उपलब्ध आहे. यांची किंमत अनुक्रमे 46,499 आणि 59,999 रुपये आहे. EZ व्हेरिएंटमध्ये 60 V/30 Ah VRLA बॅटरी आणि Classic व्हेरिएंटमध्ये 60 V/30 Ah लिथीअम आयन बॅटरी देण्यात आली आहे.
रेंज आणि स्पीड : Evolet च्या या तीनही ई-स्कूटर फुल्ल चार्ज केल्यावर 60 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. यांची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रती तास आहे.
Warrior इलेक्ट्रिक क्वॉड-बाईक : या जबरजस्त इलेक्ट्रिक क्वॉड-बाईकमध्ये 3000 व्हॅटची वॉटरप्रूफ BLDC मोटार देण्यात आली आहे. याची टॉप फॉरवर्ड स्पीड 60 किलोमीटर प्रती तास आणि रिव्हर्स स्पीड 20 किलोमीटर प्रती तास आहे. यामध्ये 72 V/40 Ah लिथीअम आयन बॅटरी देण्यात आली आहे. फुल्ल चार्ज केल्यानंतर ही क्वॉड-बाईक 50 किलोमीटरपर्यंतचं अंतर कापेल. याची किंमत 1.40 लाख रुपये आहे.
कुठे-कुठे विक्री होणार?
सुरुवातीला या गाड्या राजस्थान, पंजाब, महाराष्ट्र, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश आणि हरियाणा येथे विक्रीसाठी उपलब्ध असतील. कंपनीने या इलेक्ट्रिक टू-व्हीलर्ससाठी स्मार्टफोन अॅपची घोषणाही केली आहे. तसेच, कंपनी या गाड्यांसोबत फास्ट चार्जरही देईल. या चार्जरने 3 तासात या ई-स्कूटर चार्ज करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
संबंधित बातम्या :
Renault ची MPV Triber लाँच, किंमत फक्त…
Tata Harrier Dark Edition च्या फोटोनंतर आता किंमतही लीक