बंगळुरुतील एका पेईंग गे्स्ट राहणार्या तरुणीचा अत्यंत निर्घुनपणे गळा चिरुन खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. केवळ आपल्या प्रेयसीचे कान भरले म्हणून एका तरुणाने तिच्या मैत्रिणीचा गळा चिरुन खून केल्याची ही खळबळजनक घटना मंगळवारी रात्री घडली. या प्रकाराचा संपू्र्ण सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना मिळाल्यानंतरही पोलिसांनी अजूनही या तरुणाला शोधून न काढल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण तर झाले आहेच शिवाय या इमारतीमधील एकाही तरुणीने दुर्देवी तरुणीचा मरणाकांत आक्रोश ऐकून मदतीला न आल्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे. या प्रकरणाने संपूर्ण बंगळुरुमधील कायदा सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत.
बळीत तरुणीचे नाव किर्ती कुमारी ( वय 24 ) असे असून तिच्यावर तिच्या रुममेटच्या माजी प्रियकराने हल्ला केल्याचे स्पष्ट झाले आहे. या बेकार तरुणाचा प्रतिकार किर्ती कुमारी हिने प्राणपणाने केल्याचे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसत आहे. परंतू या बेफाम तरुणाने तिच्यावर अनेकदा चाकूचे वार केल्याचे सीसीटीव्हीत पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. या तरुणीचा आकांत ऐकून तिच्या इमारतीतील एकही तरुणी तिच्या मदतीला धावली नाही. ज्यावेळी हल्लेखोर आरामात पसार झाला. त्यानंतर गलितगात्र होऊन फरशीवर मांडी घालून बसलेल्या या तरुणीच्या जवळही एकाही तरुणीला जाण्याची हिम्मत झालेली नाही. शेवटी ही तरुणी रक्ताच्या थारोळ्यात तेथेच कोसळ्याचे सीसीटीव्हीत दिसत आहे.
एक्सवरील व्हिडीओ येथे पाहा –
This happened in a PG hostel in Koramangala, Bengaluru 3 days ago
The killer has not been caught yet
He brutally killed Kriti Kumari by slitting her neck which was caught in CCTV camera but police haven’t caught him yet. This is how Law and order has deteriorated in our city… pic.twitter.com/vMO1SZykGv— Swathi Bellam (@BellamSwathi) July 26, 2024
दुर्दैवी किर्ती कुमारी ही मूळची बिहार येथील असून एका प्रायव्हेट फर्ममध्ये नोकरी करते. बंगळुरु येथे एका इमारतीत ही तरुणी पेईंग गेस्टमध्ये राहाते. आरोपी अभिषेक हा मूळचा भोपाळचा रहिवासी आहे. परंतू सध्या नोकरी नसल्याने बेकार आहे. किर्ती कुमारी ही एका प्रोजेक्ट बेस लर्निंग प्लॅटफॉर्ममध्ये बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट म्हणून किर्ती काम करते. आरोपीचे तिच्या रुममेट मैत्रिणीशी संबंध होते. किर्तीने तिला या बेकार तरुणाशी संबंध ठेवू नको असा सल्ला तिला दिला होता. एकदा तर त्या मुलासमोरच ती दोघांवर भडकली होती. त्यानंतर तिच्या रुममेटने या तरुणांशी बोलणे बंद केले होते. किर्ती मार्चमध्ये या रुममध्ये पेइंगगेस्ट म्हणून येथे रहायला आली होती. तिने आपल्या रुममेटला या बेकार तरुणाशी संबंध तोडायला सांगत या रुममधून देखील तिला जाण्याचा सल्ला तिने दिला होता. याचा राग अभिषेक याच्या मनात होता. त्याने मंगळवारी रात्री 11 वाजता कोरामंगला येथील पेइंग गेस्ट इमारतीत प्रवेश मिळवित तिचा अशा प्रकारे बदला घेतल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. आरोपी तरुण राज्याबाहेर पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.