भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती, परीक्षेची तारीख जाहीर

| Updated on: Oct 12, 2020 | 9:05 AM

रेल्वे खात्यात रखडलेल्या 1 लाख 40 हजार 640 विविध पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे.

भारतीय रेल्वेत 1 लाख 40 हजारांहून अधिक रिक्त पदांची भरती, परीक्षेची तारीख जाहीर
indian railway latest news
Follow us on

दिल्ली : भारतीय रेल्वे खात्यातील रखडलेली भरती प्रक्रिया आता लवकरच होणार आहेत. रेल्वे खात्यात एकूण 1 लाख 40 हजार 640 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार असून त्यासाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 15 डिसेंबरला होणार आहे. (examination for different posts will will be held on December 15 said Railway Minister Piyush Goyal)

रेल्वे मंत्रालायने विविध पदांसाठी होणाऱ्या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी 15 डिसेंबर 2020 ला या परीक्षा होणार असल्याचं आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन सांगितलं आहे. पहिल्या टप्प्यात होणाऱ्या परीक्षेसाठी रेल्वे मंत्रालयाने तयारीही सुरु केली आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व नियमांचे पालन करुनच या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. तसेच कोरोनाचा प्रसार होणार नाही, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

भारतीय रेल्वेत एकूण 1,40,640 विविध पदांसाठी परीक्षा होणार आहेत. या मेगाभरतीसाठी यापूर्वीच रेल्वे मंत्रालयाने इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवलेले आहेत. परीक्षेसाठी एकूण 2.40 कोटी अर्ज आले असून त्यांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. या सर्व जागा विविध श्रेणीच्या पदांसाठी आहेत. कोरोना महामारीमुळे ही भरती प्रक्रिया रखडली होती. कोरोनामुळे रेल्वे मंत्रालयाला उमेदवारांची कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट (CBT) लांबणीवर टाकावी लागली होती.

या श्रेणींसाठी होणार परीक्षा

35,208 जागा बिगर तांत्रिक गट (NTPC) (गार्ड, लिपिक, क्लर्क)
1,663 जागा मंत्रालयीन स्तर (स्टेनो)
1,03,769 जागा ट्रॅकमन, पॉईंटमन

दरम्यान कोरोना महामारीमुळे या परीक्षा रखडल्या होत्या. अनेक इच्छुक परीक्षा लांबल्यामुळे नाराज झाले होते. परीक्षेच्या नव्या तारखा कधी जाहीर होणार?, याची वाट सर्व ते पाहत होते. आता येत्या डिसेंबरमध्ये या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे सरकारी नोकरीची इच्छा बाळगणाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

संबंधित बातम्या :

MPSC परीक्षा पुढे ढकलल्यास वय निघून जाईल, भरतीआड कोणी येऊ नये : छगन भुजबळ

मेगाभरती थांबवा, आम्ही मराठा समाजासोबत, मात्र OBC मधून त्यांना आरक्षण नको : प्रकाश शेंडगे

Devendra Fadnavis EXCLUSIVE | मराठा आरक्षण ते पोलीस भरती, देवेंद्र फडणवीस यांचे 5 सल्ले