“अण्णा… तुम्ही, आता…?”, शेवंताची हटके मुलाखत

| Updated on: Jul 05, 2019 | 4:19 PM

मुंबई: झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. गूढ, रहस्य, ट्विस्ट, प्रेम, अंधश्रद्धा, भूत आणि क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या घडामोडींमुळे ही मालिका दिवसेंदिवस चाहत्यांची वाहवा मिळवत आहे. सध्या या मालिकेच्या सीक्वलने प्रेक्षकांची थाप मिळवली आहे. कोकणातील प्रथा परंपरेचा मागोवा थेट कोकणी भाषेतून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेतील सगळ्याच […]

अण्णा... तुम्ही, आता...?, शेवंताची हटके मुलाखत
Follow us on

मुंबई: झी मराठीवरील रात्रीस खेळ चाले या मालिकेने लोकप्रियतेचं शिखर गाठलं आहे. गूढ, रहस्य, ट्विस्ट, प्रेम, अंधश्रद्धा, भूत आणि क्षणाक्षणाला बदलत जाणाऱ्या घडामोडींमुळे ही मालिका दिवसेंदिवस चाहत्यांची वाहवा मिळवत आहे. सध्या या मालिकेच्या सीक्वलने प्रेक्षकांची थाप मिळवली आहे. कोकणातील प्रथा परंपरेचा मागोवा थेट कोकणी भाषेतून मांडल्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला डोक्यावर घेतलं आहे. या मालिकेतील सगळ्याच पात्रांनी भन्नाट भूमिका वर्तवली आहे. सध्या अण्णा आणि शेवंता यांची प्रेमकहाणी ऐन भरात आली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर टीव्ही 9 मराठीने या मालिकेतील शेवंता अर्थात अपूर्वा अपूर्वा नेमळेकरशी एक्स्क्लुझिव्ह बातचीत केली. अपूर्वाला शेवंताची भूमिका कशी मिळाली, काय प्रयत्न करावे लागले याबाबत तिच्याकडून जाणून घेतलं.

शेवंताची निवड कशी झाली? या प्रश्नाचं उत्तर देताना अपूर्वा म्हणाली, “या मालिकेच्या प्रोडक्शन हाऊसमधून मला फोन आला, नवी मालिका करतोय, ऑडिशनला याल का? त्यावेळी मला सध्याच्या डेलिसोपबाबत सास बहु मालिकांमध्ये इंटरेस्ट नव्हता. मी वेगळ्या प्रकारचा रोल शोधत होते. मी ऑडिशन दिलं. त्यावेळी मी ट्रेंडिंगनुसार डेलिसोपवाला अभिनय केला. पण मला रिजेक्ट केलं. त्यावेळी शेवंतासाठी निवड सुरु आहे हे सांगितलं नव्हतं. – पुढे वाचा – 

मग काही काळाने मला पुन्हा बोलावण्यात आलं. मागच्यावेळचं काहीतरी गंडलंय हे मला सांगण्यात आलं. त्यावेळी मला आम्ही शेवंता शोधतोय, हे न राहवून सांगण्यात आलं. शेवंता अशी बाई आहे, अण्णांना असं करते, तसं करते हे सांगितलं. आम्हाला सांगायचं नव्हतं पण सांगतोय, आम्ही शेवंता शोधतोय, असं सांगण्यात आलं”

या मालिकेचा पहिला भाग मी आणि माझ्या वडिलांनी पाहिला होता. त्यामुळे शेवंताबद्दल सर्व प्रेक्षकांना जशी उत्सुकता होती, तशीच मलाही होती, त्यामुळे मी अवाक् झाले, असं ती म्हणाली.  पुढे वाचा – 

शेवंता कोण असेल याची उत्सुकता होती. सुशल्या नेहमी बोलायची आई असं करते, तसं करते वगैरे. त्यामुळे प्रेक्षकांना जशी उत्सुकता तशी शेवंता कोण याची मलाही उत्सुकता होती. त्यामुळे शेवंता मी करणार आहे हे समजल्यावर माझी प्रतिक्रिया वाव अशीच होती. तेव्हापासून प्रवास सुरु झाला, असं अपूर्वाने सांगितलं.

मी मूळची सावंतवाडी नेवळ्याची आहे. माझी भाषा वगैरे हे सगळं वेगळं कनेक्शन जुळून आलं, असं अपूर्वा म्हणाली.

पहिला डायलॉग

यावेळी अपूर्वाने पहिल्या डायलॉगची आठवण सांगितली.

“अण्णा… तुम्ही, आता…? पण पाटणकर नाहीय घरात…बरं आता आलेच आहात तर बसा. चहा आणू का तुमच्यासाठी..घ्या जरा घोटभर चहा गरीबाघरचा” ..हा डायलॉग होता.

शेवंता हे पात्र अन्य कोणत्याही अभिनेत्रीने केलं असतं, तरी ते इतकंच गाजलं असतं, असं अपूर्वाने सांगितलं.

VIDEO: