औरंगाबाद : कोरोनावरील फेबीफ्लू औषध हे औरंगाबादमध्ये दाखल झाले (Fabi flu medicine in Aurangabad Medical) आहे. फेबिफ्लूच्या 200 पावरच्या गोळ्या होलसेल मेडिकलमध्ये उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. ग्लेनमार्क कंपनीने या औषधाची निर्मिती केली (Fabi flu medicine in Aurangabad Medical) आहे.
औरंगाबादमध्ये 34 गोळ्यांचं एक पॉकेट साडेतीन हजार रुपयात उपलब्ध झाले आहे. डॉक्टरचे प्रिस्क्रिप्शन असल्यावर फेबिफ्लू गोळ्या मिळणार आहेत. कोरोनाचे सौम्य लक्षणं असणाऱ्यांसाठी हे औषध तयार केले आहे. औषध उपलब्ध झाल्यामुळे रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
नवी मुंबईतील ग्लेनमार्क फार्मास्युटिक्ल्सने कोविड 19 च्या सौम्य लक्षणांवर औषध तयार केलं आहे. विशेष म्हणजे या औषधाला भारतीय औषध महानियंत्रक (डीजीसीआय) यांनीही परवानगी दिली आहे.
“फेबीफ्लू या प्रभावी औषधाच्या उपचारामुळे हा कोरोनाचा तणाव खूप मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत मिळेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे. त्याचसोबत क्लिनिकल चाचणीत फेबीफ्लूने कोरोना व्हायरसच्या सौम्य लक्षणं असणाऱ्या रुग्णांवर चांगला परिणाम होत असल्याचा निकाल दिला आहे. हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगला पर्याय आहे. कंपनी सरकार आणि आरोग्य समुदायासोबत एकत्रितपणे काम करणार आहे. त्यामुळे देशभरात रुग्णांना हे औषध सहज उपलब्ध होऊ शकेल. हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार 103 रुपये प्रति टॅबलेट या किंमतीत बाजारात उपलब्ध होईल”, असं ग्लेनमार्क फार्मास्युटिल्सचे चेअरमन ग्लेन सल्दान्हा यांनी सांगितले आहे.
संबंधित बातम्या :
Corona Medicine : कोरोना रुग्णांवर उपचार करणारे औषध भारतात उपलब्ध
Corona Medicine | कोरोनावरील औषधाला मंजुरी मिळताच ग्लेनमार्कच्या शेअरची बाजारात उसळी