नवी दिल्ली : भारतात डाटा सुरक्षेच्या (Data Security) मुद्द्यावर फेसबुक इंडियाच्या (Facebook India) पब्लिक पॉलिसी डायरेक्टर अंखी दास यांची आज (23 ऑक्टोबर) संसदीय समितीने (Parliament Panel) 2 तास कसून चौकशी केली. अंखी दास यांचं सोशल मीडियावर (Social Media) द्वेषपूर्ण पोस्ट आणि भेदभाव प्रकरणातही गंभीर आरोप झाले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संसदीय समितीच्या या चौकशीला अंखी दास आणि फेसबुकचे बिजनेस हेड अजीत मोहन हजर झाले होते. यावेळी त्यांना वापरकर्त्यांच्या डाटा सुरक्षेवर अनेक प्रश्न विचारण्यात आले (Facebook India policy head questioned by parliament panel on Data Security).
भारतीय वापरकर्त्यांची (Indian Users) खासगी माहिती (Personal Information) लिक होण्यापासून रोखण्यासाठी आणि त्यांचा व्यक्तिगत अवकाश सुरक्षित ठेवण्यासाठी संसदीय समितीने फेसबुकसह ई-कॉमर्स कंपन्या आणि अॅप बेस्ड कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना हजर होण्याचे निर्देश दिले होते.
हेही वाचा : ‘हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या भाजप नेत्यांच्या पोस्टवर कारवाई नाही’, WSJ च्या अहवालात Facebook वर गंभीर आरोप
‘अमेझॉनचा समितीसमोर हजर राहण्यास नकार’
संसदीय समितीच्या अध्यक्षा मीनाक्षी लेखी म्हणाल्या, “ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने कोरोना साथीरोगाच्या पार्श्वभूमीवर संसर्गाच्या धोक्याचं कारण सांगत संसदीय समितीसमोर हजर राहण्यास नकार दिला आहे. संसदीय समितीसमोर उपस्थित राहण्यास नकार देणाऱ्या अमेझॉनविरोधात संसदीय विशेषाधिकारांचं हनन केल्याप्रकरणी कडक कारवाई केली जाऊ शकते”
28 ऑक्टोबरला अमेझॉनला देखील संसदीय समितीसमोर हजर राहायचं होतं. मात्र, त्याआधीच त्यांनी आपला नकार कळवला आहे. अमेझॉन कंपनीने आपले वरिष्ठ अधिकारी सध्या भारतात हजर नसल्याचाही युक्तिवाद केला आहे. तसेच समितीने दिलेल्या तारखेला हजर राहू शकणार नाही, असं म्हटलं आहे. दुसरीकडे संसदीय समितीने म्हटलंय, अमेझॉनचे भारतात जवळपास 40 कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे डाटा सुरक्षेबाबत कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करणं आवश्यक आहे.
डाटा सुरक्षे प्रकरणी गुगल आणि पेटीएमच्या अधिकाऱ्यांना देखील 29 ऑक्टोबरला संसदीय समितीने हजर होण्यास सांगितलं आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात 300 मिलियनपेक्षा अधिक वापरकर्ते असलेल्या फेसबुकला त्यांचं उत्पन्न किती आणि किती कर भरत आहेत याचीही चौकशी करण्यात आली आहे.
हेही वाचा :
‘फेसबुकच्या द्वेषपूर्ण पोस्ट प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा’, काँग्रेसचं थेट मार्क झुकरबर्गला पत्र
Apple, Amazon, Facebook, Google च्या प्रमुखांवर गंभीर आरोप, अमेरिकेच्या संसदेत सर्वांची झाडाझडती
फेसबुकला 34 हजार कोटी रुपयांचा दंड
एकट्या भाजपकडून सोशल मीडियावरील जाहिरातींवर 25 कोटींचा खर्च, इतर पक्षांकडून किती?
Facebook India policy head questioned by parliament panel on Data Security