मुंबई : मंत्रालयजवळ आकाशवाणी येथे आमदार निवास बॉम्बने उडवणार असा निनावी कॉल काल (28 सप्टेंबर) रात्री आला होता (Fake call on MLA house). कॉल आल्यानंतर आमदार निवासमध्ये एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर तिथल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना संपूर्ण माहिती दिली (Fake call on MLA house).
पाच मिनिटात आमदार निवास बॉम्बने उडवणार, असं निनावी कॉलमधील व्यक्तीने सांगितले होते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांनी तातडीने पोलिसांना कॉल करुन याबाबतची माहिती दिली.
पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सर्वांना तातडीने बाहेर काढले आणि श्वान पथकासह इमारतीमधील प्रत्येक रुमची तपासणी करण्यात आली. त्यासोबत आजूबाजूचा परिसरही तपासण्यात आला. पण या दरम्यान कोणतीही आक्षेपार्ह वस्तू सापडली नाही.
दोन तासानंतर इमारतीमध्ये पुन्हा सर्वांना प्रवेश देण्यात आला. मात्र या घटनेमागणे कोण आहे, कॉल कुठून करण्याता आला याचा शोध पोलीस घेत आहेत. सुदैवाने कुठलाही अप्रिय घटना घडली नाही आणि सर्वजण सुरक्षित आहेत.
संबंधित बातम्या :
गळफास नव्हे, गळा कापून आत्महत्या, मिरजेतील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचं थरारक कृत्य
आधी प्रेयसीवर गोळीबार, मग सासऱ्यांची हत्या, पोलीस उपनिरीक्षक परागंदा