चंद्रपूर : पोलीस अधीक्षकांच्या नावे बनावट फेसबुक अकाऊंट उघडून लोकांकडे पैशांची मागणी करत (Fake Facebook Account Of Superintendent Of Police) असल्याचा प्रकार चंद्रपुरात समोर आला आहे. या सायबर गुन्हेगारांनी थेट पोलीस अधीक्षकांनाच लक्ष्य केल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट तयार करुन लोकांकडे पैशांची मागणी केली जात होती. लोकांनी अरविंद साळवे यांच्याकडे फोन करुन विचारणा केल्यावर हा सर्व प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत (Fake Facebook Account Of Superintendent Of Police).
चंद्रपूर पोलिसांचा सायबर गुन्हे शाखा विभाग अतिशय सक्षम समजला जातो. आजवर सायबर गुन्हे शाखेने अनेक क्लिष्ट प्रकरणे उजेडात आणली आहेत. तर शेकडो प्रकरणात आरोपींना जबर शिक्षा झाली आहे. मात्र, ताजा गुन्हा चक्क जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांच्या बाबतीतच घडला आहे. सायबर गुन्हेगारांनी चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांच्या नावाचे बनावट फेसबुक आयडी तयार करत लोकांना त्यावर जोडणे सुरु केले आहे. या फेसबुक खात्याच्या माध्यमातून नागरिकांना पैशाची मागणी केली जात असून त्यासाठी विविध कारणे पुढे केली जात आहेत.
दरम्यान, अशा प्रकारे पैशांची मागणी करणारे काही कॉल्स या फेसबुक अकाऊंटशी जोडले गेलेल्या नागरिकांना आल्यानंतर त्यांनी खुद्द पोलीस अधीक्षकांनाच याची माहिती दिली. त्यातून हा प्रकार उजेडात आला आहे. चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने या सायबर गुन्हेगारांविरोधात आता रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून असे बनावट फेसबुक खाते तयार करणाऱ्या आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून अनेक फेसबुक खातेदारांमध्ये पुन्हा पुन्हा नव्या खात्याच्या माध्यमातून फ्रेंड रिक्वेस्ट येत असून त्यामुळे फेसबुक वापरकर्त्यात संभ्रम निर्माण झाला आहे. ताजा प्रकार याच मालिकेतील असल्याचं सांगण्यात येतं.
पोलिसांनी मात्र एकदा फ्रेंड असलेल्या मित्राची पुन्हा फ्रेंड रिक्वेस्ट आल्यास त्याची पडताळणी करण्याचे आवाहन या निमित्ताने केले आहे. अशा प्रकारे बनावट फेसबुक तयार करुन पैशाची मागणी अथवा रक्कम लंपास करणाऱ्यांविरोधात चंद्रपूर पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने कंबर कसली आहे.
बारामती पोलिसांची दमदार कामगिरी, विविध गुन्ह्यातील सराईत आरोपींना अटक, 14 लाखांचा मुद्देमाल जप्त#baramati @puneruralpolice #baramatipolicehttps://t.co/I5jUEZPcxj
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 15, 2020
Fake Facebook Account Of Superintendent Of Police
संबंधित बातम्या :
मंदिरे उघडताच चोरट्यांचा हैदोस, CCTV वर पोते टाकून दानपेटी फोडली
रस्त्याने बोलत जाणाऱ्यांचे मोबाईल पळवायचे, सोलापूर पोलिसांकडून तीन आरोपींना बेड्या