Amitabh Bachchan | ‘फॅमिली अॅट वर्क’, ‘बिग बीं’चे सहकुटुंब चित्रीकरण, सेटवरून फोटो शेअर!

| Updated on: Nov 25, 2020 | 2:13 PM

कुटुंबासमवेत चित्रीकरण करताना अमिताभ बच्चन यांनीही फॅमिली टाईमचा आनंद लुटला आहे.

Amitabh Bachchan | ‘फॅमिली अॅट वर्क’, ‘बिग बीं’चे सहकुटुंब चित्रीकरण, सेटवरून फोटो शेअर!
Follow us on

मुंबई : कोरोनावर मात करत बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) एकापाठोपाठ उरलेले चित्रीकरण संपवत आहेत. ‘कौन बनेगा करोडपती 12’ या गेम रिअॅलिटी शो व्यतिरिक्त बिग बींनी नुकतेच एका नवीन जाहिरातीचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. या जाहिरातीत त्यांच्यासोबत पत्नी जया बच्चन (Jaya Bachchan) आणि मुलगी श्वेता नंदा देखील दिसणार आहेत (Family at Work Amitabh Bachchan Share’s A photo with jaya bachchan and Shweta nanda).

कुटुंबासमवेत चित्रीकरण करताना अमिताभ बच्चन यांनीही फॅमिली टाईमचा आनंद लुटला आहे. नुकताच बिग बींनी जाहिरातीच्या सेटवरुन एक फॅमिली ग्रुप फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ते स्वतः काढत आहेत. तर, मुलगी श्वेता नंदा मास्क सांभाळत मोबाइल पकडताना दिसत आहे. या फोटोत जया बच्चन कॅंडिड कॅप्चर झाल्या आहेत. हा फोटो शेअर करत अमिताभ बच्चन यांनी इन्स्टाग्रामवर ‘फॅमिली अॅट वर्क’ असे छान कॅप्शन लिहिले आहे.

पारंपरिक पोशाख

चित्रिकरणादरम्यान संपूर्ण बच्चन कुटुंब एथनिक वेअरमध्ये दिसत आहे. बिग बींनी पिवळ्या रंगाचा कुर्ता, मण्यांची माळ आणि एक पांढरी पगडी परिधान केलेले आहे. तर, जया बच्चन आणि श्वेताने गुलाबी आणि पांढर्‍या साडीसह हेवी ज्वेलरी परिधान केली आहे.

शूटमधील दुसर्‍या दृश्यामध्ये बिग बींनी खादीचा कोट आणि पांढरा कुर्ता पायजामासह, पांढरी टोपी घातली आहे. तर, जया बच्चन यांनी बनारसी साडी आणि गळ्यात सुंदर चोकर परिधान केला आहे. यावेळी श्वेता बच्चन हलक्या पिवळ्या रंगाचा सूट आणि डायमंड ज्वेलरीमध्ये दिसली आहे. हे फोटो अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून शेअर केले आहेत.

यापूर्वीही बिग बी आणि जया बच्चन अनेक ज्वेलरी ब्रँडच्या जाहिरातींमध्ये एकत्र दिसले होते. याशिवाय एका ब्रँड शूटमध्ये अमिताभ आणि जया यांनी कतरिना कैफच्या पालकांची भूमिका निभावली होती. जया बच्चन वगळता बिग बींच्या संपूर्ण कुटुंबाला जुलैमध्ये कोरोना व्हायरसची लागण झाली होती. कोरोनावर यशस्वी मात करत, बिग बींने ‘केबीसी 12’चे चित्रीकरण सुरू केले होते. लॉकडाऊननंतर जया आणि श्वेता यांनी प्रथमच चित्रीकरण केले आहे.

(Family at Work Amitabh Bachchan Share’s A photo with jaya bachchan and Shweta nanda)