नवी दिल्ली : दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचा आज (9 डिसेंबर) 14 वा दिवस आहे. गेल्या दोन आठवड्यात शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकीच्या फेऱ्या झडल्या, मात्र त्यातून ठोस तोडगा निघालेला नाही. कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या आणि विरोधी पक्षांनी पाठिंबा दिलेल्या ‘भारत बंद’ला देशभरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ram Nath Kovind) यांची भेट घेणार आहेत. शरद पवार यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माकप नेते सीताराम येचुरी, भाकप नेते डी. राजा, द्रमुक नेते टीकेएस एलानगोवन या विरोधी पक्षातील दिग्गजांचे शिष्टमंडळाने आज राष्ट्रपतींची भेट घेतली असून, त्यानंतर शेतकरी कायदे रद्द करा, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. (Farmer Protest at Delhi Singhu Border Live Updates)