नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबचे शेतकरी दिल्लीत पोहोचले आहेत. शेतकऱ्यांनी बुराडी मैदानात निदर्शनं करण्यास नकार दिला आहे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. आम्ही पूर्ण तयारी करुन आलो आहे. चार ते पाच महिने दिल्लीतीन रस्त्यांवर विरोध प्रदर्शन करु शकतो, असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. (Farmer protest update farmer leaders said they will protest five months)
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर दिल्लीतील पाच प्रमुख रस्ते अडवणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. दिल्लीत प्रवेश करणारे प्रमुख रस्ते अडवण्यात येतील, असंही शेतकऱ्यांनी म्हटलं.
आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आमचा कट्टरपंथी संघटनांशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, असं स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी केंद्र सरकारनं तीन कृषी कायदे मागे घेतले तर आम्ही आंदोलन मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले. सरकारसोबत कोणत्याही अटीशिवाय चर्चा करणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Instead of going to open jail in Burari, we’ve decided that we will gherao Delhi by blocking 5 main entry points to Delhi. We’ve got 4 months ration with us, so nothing to worry. Our Operations Committee will decide everything: Surjeet S Phul, President, BKU Krantikari (Punjab) https://t.co/aH5xm26WAi pic.twitter.com/2L0yL7vVmf
— ANI (@ANI) November 29, 2020
पंजाबच्या शेतकऱ्यांनी विविध संघटनांची एक संयुक्त समिती बनवली आहे. शेतकरी आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे. मात्र, कोणताही राजकीय नेत्याला शेतकऱ्यांसमोर भाषण करण्यास मनाई करण्यात आली आहे. (Farmer protest update farmer leaders said they will protest five months)
बुराडी मैदानात जाणे म्हणजे खुल्या तुरुगांत जाण्यासारखे असल्यामुळे तिथे निदर्शने करण्यास जाणार शेतकऱ्यांनी नकार दिला आहे.
आंदोलकांना रोखण्यासाठी सरकरानं सर्व मार्ग अवलंबले. बॅरिकेडिंग केले गेले. खड्डे काढण्यात आले. ट्रक आणले गेले. मात्र, शेतकऱ्यांनी सर्व अडचणींवर मात करत दिल्लीत प्रवेश केला,असं शेतकऱ्यांनी सांगतिले. सरकारनं सुरुवातीला एक देश एक मार्केट सांगितले. मात्र, प्रत्यक्षात एक देश दोन मार्केट, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यांतर्गत एक मार्केट बनलं आहे तर दुसऱ्या मार्केटवर कोणाचे नियंत्रण नाही, तिथे शेतकऱ्यांशिवाय कोणीही येऊ शकते. सरकार शेतकऱ्यांची लूट करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
अमित शाहांचा प्रस्ताव नाकारला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांना दिल्लीतील बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र,बुराडी मैदान हा खुला तुरुंग असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारला. शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी कोणत्याही अटीशिवाय चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले. (Farmer protest update farmer leaders said they will protest five months)
संबंधित बातम्या :
‘अमित शाह यांचं आवाहन स्वीकारा’, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांची आंदोलक शेतकऱ्यांना विनंती
(Farmer protest update farmer leaders said they will protest five months)