पुणे : पिंपरी-चिंचवडमधील रहिवाशांनी थेट शेतकऱ्यांना भाजी विक्रीसाठी सोसायटीत (Farmer food sale in society) बोलावलं आहे. तसेच सोशल डिस्टन्सिंग पाळत रहिवाशांनी भाज्या खरेदी केल्या. रहाटणीतील लेगसी ऑरा सोसायटीत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. रहिवाशांच्या या नव्या कल्पनेमुळे पिंपरी-चिंचवडमधील इतर सोसाट्यांनीही ही कल्पना राबवावी असं स्थानिकांकडून आवाहन (Farmer food sale in society) करण्यात आलं आहे.
एकीकडे मुंबई आणि पुण्यात भाजीपाला खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसत आरहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील सोसायट्यांनी सोशल डिस्टन्स पाळत एक नवा उपक्रम राबवला.
पिंपरी-चिंचवडमधी कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्याही आता कमी झालेली दिसत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये आज पुन्हा पाच कोरोनाग्रस्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या रुग्णांना रुग्णालयातील नर्स, डॉक्टर आणि स्टाफने टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला. तसेच दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज दिलेले तीन आणि आजचे पाच असे एकूण पिंपरीत आठ कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये सुरुवातीला एकूण 12 रुग्ण होते. त्यापैकी 4 रुग्णांवर अजूनही उपचार सुरु आहेत. 15 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आली आहे. तर दुसरे नमुने आज पाठवले असून ते ही निगेटिव्ह आले तर त्या कोरोनाबाधितांना उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे.
दरम्यान, राज्यात तसेच देशात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 193 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशाता आतापर्यंत एक हजारपेक्षा अधिकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आलं आहे.