एफडीएच्या कारवाईत पुण्यातील समोशाबाबत धक्कादायक खुलासा

| Updated on: Jun 09, 2019 | 8:12 PM

शहरासह पिंपरीतील नामांकित सिनेमागृहांमधील समोसा निकृष्ट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यात अनेक ठिकाणी समोसा पुरवठा करणाऱ्या समोसा कारखान्यावर एफडीएने केलेल्या कारवाईतून हे उघड झालं.

एफडीएच्या कारवाईत पुण्यातील समोशाबाबत धक्कादायक खुलासा
Follow us on

पुणे : शहरासह पिंपरीतील नामांकित सिनेमागृहांमधील समोसा निकृष्ट असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पुण्यातील आयनॉक्स, पीव्हीआर, सिनेपोलिस, विशाल ई-स्क्वेअर या ठिकाणी समोसा पुरवठा करणाऱ्या समोसा कारखान्यावर अन्न आणि औषध प्रशासनाने (FDA) केलेल्या कारवाईतून हे उघड झालं.

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केलेल्या कारवाईत पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रसिद्ध थिएटरमध्ये मिळणारा समोसा अतिशय अस्वच्छ ठिकाणी बनवला जात असल्याचे स्पष्ट झाले. पिंपरी चिंचवड परिसरातील खराळवाडी येथील एम. के. इंटरप्राजेसमध्ये एफडीएने कारवाई केली. संबंधितांना यापुढे समोसे उत्पादन आणि विक्री करण्यावर बंदी घालण्यात आल्याची माहिती पुणे अन्न आणि औषध प्रसासन विभागाचे सहआयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली.

दरम्यान, यापूर्वी मनसेने याच थिएटरमध्ये मिळणाऱ्या खाद्य पदार्थांची किंमत कमी करण्यासाठी आंदोलन केले होते. आता याच खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचाही भांडोफोड झाला. त्यानंतर आता पुणेकरांच्या आरोग्याशीच खेळ सुरु असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. समोसा कारखाण्यातील  अस्वछता, एकच तेल अनेकदा वापरणे अशा कारणास्तव अन्न आणि औषध प्रशासन विभागाने कारवाई केली आहे. मात्र ही कारवाई तात्पुरती न राहता कायमस्वरुपी करावी, अशीही मागणी नागरिक करत आहेत.