लातुरात दालमिल मशिनमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू

| Updated on: Jun 28, 2020 | 5:35 PM

दालमिल मशिनमध्ये दाळ ढकलत असताना माया ज्यावर बसल्या होत्या तो पत्रा कोसळला. त्यामुळे माया बाजूळगे या मशीनमध्ये अडकल्या.

लातुरात दालमिल मशिनमध्ये अडकून महिला मजुराचा मृत्यू
Follow us on

लातूर : लातुरात दालमिलमध्ये अडकून महिला मजुराचा (Female Labor Died After Stuck In Dalmill Machine) मृत्यू झाला. शहरातल्या एमआयडीसी भागात असलेल्या दालमिलमध्ये काम करताना मशिनमध्ये अडकल्याने ही दुर्दैवी घटना घडली. माया बाजूळगे असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव (Female Labor Died After Stuck In Dalmill Machine) आहे.

दालमिल मशिनमध्ये दाळ ढकलत असताना माया ज्यावर बसल्या होत्या, तो पत्रा कोसळला. त्यामुळे माया बाजूळगे या मशिनमध्ये अडकल्या. मशिनमध्ये अडकल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या माया बाजूळगे यांना दोन मुलं आहेत. त्यांचे पतीही मजुरी करतात. अपघात घडला त्या दालमिलमध्ये मजुरांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्याही प्रकारची उपाययोजना नाही. शिवाय, मजुरांना विमा संरक्षणही नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शोकाकुल वातावरणात माया बाजूळगे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Female Labor Died After Stuck In Dalmill Machine

संबंधित बातम्या :

अहमदनगरमध्ये विहिरीत उडी मारुन पतीची आत्महत्या, पतीला वाचवताना पत्नीचाही मृत्यू

चंद्रपूर जिल्हा बँकेच्या पदभरतीत फसवणूक, अध्यक्षांसह बँक व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल

यवतमाळमध्ये हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड, 47 लाखांचा मुद्देमाल जप्त, 38 जणांना अटक