मुंबई : ड्रग्ज प्रकरणी बॉलिवूड निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांच्या पत्नीला एनसीबीने अटक केल्यानंतर त्यांनाही समन्स बजावण्यात आले होते. याप्रकरणी चौकशीकरता फिरोज नाडियाडवाला एनसीबीच्या कार्यालयात (NCB Office) दाखल झाले आहेत. ड्रग्ज प्रकरणी (Drugs Case) एनसीबीने अटक केलेले चार तस्कर आणि बॉलिवूड निर्माता फिरोज नाडियाडवालाची (Firoz Nadiadwala) पत्नी शबाना सईद यांना आज वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. 8 नोव्हेंबर रोजी एनसीबीने या 5 जणांना अटका केली होती. दरम्यान, निर्माते फिरोज नाडियाडवालाही एनसीबीने (NCB) समन्स बजावले होते.
Mumbai: Film producer Firoz Nadiadwala arrives at Narcotics Control Bureau
His wife Shabana Saeed was arrested by NCB yesterday, in a drug-related case pic.twitter.com/BXjUke8edi
— ANI (@ANI) November 9, 2020
नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने (NCB) ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) रविवारी (8 नोव्हेंबर) मुंबईमध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. यात ‘वेलकम’ चित्रपटाचे निर्माते फिरोज नाडियाडवाला (Firoz Nadiadwala) यांच्या घराचाही समावेश होता. एनसीबीला फिरोज यांच्या घरात ड्रग्ज सापडले आहेत. यानंतर त्यांची पत्नी शबाना सईद यांना अटक करण्यात आली होती.
बॉलिवूड ड्रग्ज रॅकेट प्रकरणी अमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) रविवारी मुंबईतील अंधेरी, खारघरसह पाच परिसरांत छापे टाकण्यात आले. बॉलिवूडशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या घर आणि कार्यालयांवर हे छापे टाकण्यात आले होते (Firoz Nadiadwala’s wife and four drug peddlers being taken for their medical examination By NCB).
अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश झाला होता. तेव्हापासून एनसीबीकडून बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटची पाळेमुळे खोदण्याचे काम सुरु आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या कारवाईत बॉलिवूडमधील अनेक बडे दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या घर आणि कार्यालयांवर छापे टाकण्यात आले आहेत. शनिवारी रात्रीपासूनच या कारवाईला सुरुवात झाल्याचे सांगितले जाते.
रविवारी (8 नोव्हेंबर) सकाळी फिरोज यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली. यावेळी एनसीबीने 3 मोबाईलसह ड्रग्ज जप्त केले. यानंतर नाडियाडवाला यांच्या पत्नीच्या अटकेची माहिती समोर आली. NCB च्या या कारवाईत फिरोज नाडियाडवाला यांच्या घरात एकूण 717.1 ग्रॅम गांजा, 74.1 ग्रॅम चरस आणि 95.1 ग्रॅम एमडी अमली पदार्थ सापडले होते. याची किंमत 3 लाख 66 हजार 610 रुपये आहे. यानंतर NCB च्या अधिकाऱ्यांनी शबाना सईद यांना त्यांच्या गुलमोहर क्रॉस रोडवरील घरातून घरातून अटक केली.
एनसीबीने मालाड, अंधेरी, लोखंडवाला, खारघर, कोपरखैरणेमध्ये अनेक ड्रग्स पेडलर्सच्या ठिकाणांवर छापेमारी केली. या छापेमारीत 5 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली होती. यातीलच एका ड्रग्ज तस्कराने चौकशीदरम्यान एनसीबीला फिरोज नाडियाडवाला यांचे नाव सांगितले होते.
(Firoz Nadiadwala’s wife and four drug peddlers being taken for their medical examination By NCB).