नवी दिल्ली : संसदेच्या अॅनेक्स इमारतीत आग लागल्याची घटना घडली आहे. आगीच्या माहितीनंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर रवाना झाल्या (Fire in Indian Parliament). अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
संसदेतील ही आग सहाव्या मजल्यावरुन लागल्याची माहिती मिळत आहे. इलेक्ट्रिक बोर्डजवळ शॉर्ट सर्किट झाल्याने ही आग लागली. आग संसदेच्या इतर भागात पसरण्याआधीच आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अनर्थ टळला.
#UPDATE Delhi: The fire that broke out on the 6th floor of the Parliament Annexe Building, has been brought under control. 7 fire tenders were engaged in the fire fighting operation. https://t.co/8b0t2sce4M
— ANI (@ANI) August 17, 2020
दिल्ली फायर सर्विसचे अधिकारी या आग प्रकरणाचा तपास करत आहेत. सकाळी 7.30 वाजता आग लागली होती. यानंतर तात्काळ अग्निशामक दलाच्या 7 गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली.
हेही वाचा :
Rain Updates: कृष्णा आणि पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली, मराठवाड्यातही मुसळधार, नदी-नाल्यांना पूर
मुंबईत 20 वॉर्डमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर एक टक्क्यापेक्षा कमी, कुठे काय स्थिती?
हम बहुत छोटे लोग, हेलिकॉप्टरसे आते नही, 79 व्या वर्षी कोश्यारींनी पायीच शिवनेरी केला सर
Fire in Indian Parliament